Galaxy Z Flip 4 ची किंमत त्याच्या मागील जनरेशन Galaxy Z Flip 3 सारखी असण्याची शक्यता
नवीन फोल्डेबल स्मार्टफोन Samsung Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये लाँच होण्याची शक्यता
Samsung Galaxy Z Flip 4 ची किंमत पुन्हा एकदा लीक झाली आहे. याव्यतिरिक्त, एका टिपस्टरने असेही संकेत दिले आहेत की, सॅमसंगचा आगामी फोल्डेबल फोन तीन व्हेरिएंटमध्ये येईल. फोल्डेबल फोनची किंमत त्याच्या आधीच्या मॉडेलसारखीच असेल, असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. 10 ऑगस्ट रोजी Samsung Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये Galaxy Z Fold 4 फोल्डेबल फोन आणि Galaxy Watch 5 सिरीजसोबत स्मार्टफोन लाँच केला जाण्याची शक्यता आहे. अलीकडेच, या दोन्ही फोल्डेबल हँडसेटचे कलर आणि डिझाइन देखील लीक झाले आहेत.
एका अहवालात दावा केला आहे की, Galaxy Z Flip 4 बेस व्हेरिएंटसाठी EUR 1,080 म्हणजेच अंदाजे 88,500 रुपयांपासून सुरू होईल, जो 128GB स्टोरेजसह येईल. तसेच, 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत EUR 1,160 म्हणजेच अंदाजे 95,000 रुपये असेल. शेवटी 512GB स्टोरेजसह टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएंटची किंमत EUR 1,280 म्हणजेच अंदाजे 1,04,850 रुपये असण्याची शक्यता आहे. Galaxy Z Flip 4 ची किंमत त्याच्या मागील जनरेशन Galaxy Z Flip 3 सारखीच आहे. क्लॅमशेल फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Z Flip 3 ची लाँच किंमत 84,999 रुपये होती.
मात्र, सॅमसंगने स्मार्टफोनबद्दल अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.
Galaxy Z Flip 4 मध्ये काय असेल विशेष ?
Galaxy Z Flip 4 10 ऑगस्ट रोजी शेड्यूल झालेल्या Samsung Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये लाँच होईल, असे म्हटले जात आहे. हे Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Watch 5 सिरीजसह लॉन्च केले जाईल. फोन 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले, 8GB रॅमसह स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिप आणि 512GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज, 12-मेगापिक्सेल ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि चार कलर ऑप्शन्ससह येईल असे म्हटले जात आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.