प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi च्या आगामी बजेट Redmi A4 स्मार्टफोनची चर्चा बरेच दिवसांपासून सुरु होती. अखेर आज कंपनीने Redmi A4 5G च्या भारतीय लाँच डेटची पुष्टी केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा Redmi स्मार्टफोन अनेक पॉवरफुल फीचर्ससह येईल. एवढेच नाही तर, हा स्मार्टफोन लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर सूचिबद्ध करण्यात आला आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनच्या मायक्रो वेबसाइटवरून फोनचे अनेक तपशील देखील पुढे आले आहेत. याव्यतिरिक्त, Amazon पेजवरून हे देखील समोर आले आहे की, हा Redmi फोन 5G कनेक्टिव्हिटीसह येईल. तसेच, पृष्ठावर इतर महत्त्वाची फीचर्स देखील उघड करण्यात आली आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात Redmi A4 5G चे भारतीय लॉन्चिंग तपशील-
वर सांगितल्याप्रमाणे, Redmi ने Redmi A4 स्मार्टफोनसाठी Amazon वर मायक्रो वेबसाईट लाईव्ह केली आहे. त्याबरोबरच, कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देखील फोनच्या लाँच डेटबद्दल माहिती दिली आहे. मायक्रो वेबसाइटनुसार, Redmi A4 5G फोन 20 नोव्हेंबर 2024 रोजी लाँच होईल. हा फोन ब्लॅक आणि ग्रे कलर ऑप्शन्समध्ये सादर केला जाईल. फोनच्या मागे गोल कॅमेरा मॉड्यूल मिळणार आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, Redmi A4 5G चे काही फीचर्स आणि स्पेक्स उघड करण्यात आले आहेत. त्यानुसार, या फोनमध्ये 6.88 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असेल. हा स्मार्टफोन प्रीमियम हॅलो ग्लास आणि सँडविच डिझाइनसह येईल. तर, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5160mAh बॅटरी असेल. फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. सध्या मायक्रो वेबसाइटवरून फोनचे फक्त हेच तपशील समोर आले आहेत. फोनचे इतर सर्व तपशील लाँचनंतर पुढे येतील.