Nokia 6 (2018) चा 4GB वेरिएंट भारतात झाला लॉन्च, किंमत आहे Rs 18,999
Nokia ने भारतात आपल्या Nokia 6 (2018) चा 4GB मॉडेल लॉन्च केला आहे, हा डिवाइस भारतात Rs 18,999 च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे.
जसे की काही दिवसांपूर्वी समोर आले होते आणि कंपनी ने टीज पण केले होते, त्यानुसार Nokia ने भारतात आपला Nokia 6 (2018) जो Nokia 6.1 नावाने ओळखला जातो, आणला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही कोणत्या डिवाइस बद्दल बोलत आहोत, आम्ही बोलत आहोत Nokia 6 (2018) स्मार्टफोन च्या नवीन 4GB रॅम वाल्या मॉडेलची. हा भारतात लॉन्च करण्यात आला आहे आणि याची किंमत Rs 18,999 ठेवण्यात आली आहे. आता पर्यंत या डिवाइसचा 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वर्जनच भारतात मिळत होता. पण आता याचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वर्जन पण विकत घेता येईल. हा नवीन मॉडेल 13 मे पासून अमेजॉन इंडिया वरून घेता येईल. पण अजून याची माहिती मिळाली नाही की हा डिवाइस ऑफलाइन बाजारात पण घेता येईल की नाही ते. याचा 3GB मॉडेल ऑफलाइन बाजारात उपलब्ध आहे.
तसेच अमेजॉन इंडिया बद्दल बोलायचे तर कंपनी ने हा स्मार्टफोन काही नवीन ऑफर्स सह लिस्ट केला आहे. त्याचबरोबर भारती एयरटेल कडून तुम्हाला या डिवाइस सोबत Rs 2,000 ची कॅशबॅक ऑफर पण मिळत आहे, तसेच तुम्हाला 31 डिसेंबर 2018 पर्यंत एयरटेल टीवी चे सब्सक्रिप्शन पण मिळत आहे. फोन अमेजॉन इंडिया वरून नो-कॉस्ट EMI ऑप्शन सह पण विकत घेता येईल.
या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये रॅम आणि स्टोरेज व्यतिरिक्त इतर कोणताही फरक दिसत नाही. हा डिवाइस त्याच सर्व स्पेक्स सह जे आपण 3GB मॉडेल मध्ये बघितले होते, सोबत लॉन्च केला गेला आहे. या दोन्ही स्मार्टफोन्स मधील मोठा फरक फक्त रॅम आणि स्टोरेज चा आहे.
Nokia 6 (2018) स्मार्टफोन च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन भारतात काही बदल करून लॉन्च केला गेला आहे, त्याचप्रमाणे इतर सर्व स्मार्टफोंस मध्ये तुम्हाला काही ना काही फरक नक्की बघायला मिळेल. Nokia 6 (2018) स्मार्टफोन 6000 सीरीज च्या एल्युमीनियम पासून बनवण्यात आला आहे, ज्यामुळे हा खुप ड्यूरेबल आहे.
सोबत या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला बोथी इफेक्ट पण मिळत आहे. तसेच स्मार्टफोन मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 630 प्रोसेसर पण मिळत आहे, स्मार्टफोन मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही स्मार्टफोन फक्त 30 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पुर्ण चार्ज करू शकता. फोन ब्लू, ब्लॅक आणि आयरन गोल्ड रंगात भारतात सादर केला गेला आहे.
नवीन Nokia 6 स्मार्टफोन एका 5.5-इंचाच्या IPS FHD डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे, तसेच यात 4GB ची रॅम सह 32GB/64GB इंटरनल स्टोरेज ऑप्शन उपलब्ध आहेत, सोबतच याची स्टोरेज तुम्ही माइक्रोएसडी कार्ड ने 128GB पर्यंत वाढवीत येते.
फोन मध्ये एक 16-मेगापिक्सल चा कॅमेरा ड्यूल टोन LED फ्लॅश सह देण्यात आला आहे, याव्यतिरिक्त यात एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण आहे. फोन मध्ये एक 3000mAh क्षमता असलेली बॅटरी पण देण्यात आली आहे.