अवघ्या 25 वर्षांनंतर नवीन अवतारात परतला Nokia 3210 फोन! मिळेल तब्बल 32GB पर्यंत स्टोरेज, बघा किंमत
HMD Global ने Nokia 3210 (2024) नवा फिचर फोन लाँच केला.
हा फोन अवघ्या 25 वर्षांनंतर परतला असून यावेळी तो अतिशय आकर्षक रंगात सादर करण्यात आला आहे.
यात यूट्यूब शॉर्ट्स, न्यूज, वेदर अपडेट्स इ. क्लाउड ॲप्स उपलब्ध
लोकप्रिय फिचर फोन Nokia 3210 पुन्हा रिलीज करण्यात आला आहे. हा लोकप्रिय फीचर फोन अवघ्या 25 वर्षांनंतर परतला असून यावेळी तो अतिशय आकर्षक रंगात लाँच करण्यात आला आहे. नवीन फोन Nokia 3210 (2024) मोनिकरसह येतो. HMD Global ने Nokia 3210 (2024) मध्ये 2.4 इंच लांबीची TFT LCD स्क्रीन दिली देखील देण्यात आहे. चला तर मग जाणून घेऊयात या फोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-
हे सुद्धा वाचा: Good News! BSNL 4G सर्व्हिस ऑगस्ट 2024 मध्ये होणार लाईव्ह? Jio आणि Airtel ला बसेल का धक्का? Tech News
Nokia 3210 (2024) ची किंमत
Nokia 3210 (2024) ची किंमत 89 युरो इतकी आहे. कंपनीने Nokia 3210 (2024) जर्मनी, स्पेन आणि यूके सारख्या बाजारपेठांमध्ये लाँच केले आहे. हा फोन लवकरच मध्य पूर्व, आफ्रिका आणि भारतासारख्या बाजारपेठांमध्ये लाँच केला जाईल, अशी शक्यता आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन ग्रंज ब्लॅक, Y2K गोल्ड, सुब्बा ब्लू या कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.
Nokia 3210 (2024) चे तपशील
Nokia 3210 (2024) मध्ये 2.4 इंच लांबीचा TFT LCD डिस्प्ले आहे. यात प्रोसेसिंगसाठी Unisoc T107 चिपसेट देण्यात आली आहे. रॅम आणि स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, Nokia 3210 (2024) मध्ये 64MB रॅम आणि 128MB स्टोरेज आहे. मायक्रो SD कार्डच्या मदतीने हे 32GB पर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये FM रेडिओ, MP3 प्लेयर आणि क्लासिक स्नेक गेमचाही समावेश आहे. त्याबरोबरच, यात यूट्यूब शॉर्ट्स, न्यूज, वेदर अपडेट्स इ. क्लाउड ॲप्स देखील फोनमध्ये समर्थित आहेत.
फोनच्या मागील बाजूस 2MP मुख्य कॅमेरा आहे ज्यासोबत LED फ्लॅश देखील देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर Nokia चा हा फीचर फोन 1,450mAh बॅटरीने सुसज्ज आहे. बॅटरी 9.8 तासांचा टॉकटाइम देऊ शकते, असे कंपनीने सांगितले आहे. फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी हा फोन ब्लूटूथ 5.0 ला सपोर्ट करतो. त्याबरोबरच, फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक देखील आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile