Motorola च्या आगामी फोल्डेबल स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्चा सर्वत्र सुरु होती. अखेर ब्रँडने आपल्या नवीन फ्लिप फोन Motorola Razr 50 ची भारतीय लाँच डेट जाहीर केली आहे. हा स्मार्टफोन सप्टेंबरच्या सुरुवातीला लाँच केला जाणार आहे. विशेष म्हणजे Google Gemini आणि डेस्क मोड आगामी फ्लिप फोनमध्ये उपलब्ध असेल. लक्षात घ्या की, याआधी कंपनीने Moto Razor 50 Ultra Flip डिवाइस भारतीय बाजारात लाँच केला होता. जाणून घेऊयात Motorola Razr 50 चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-
लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता Motorola च्या मते Motorola Razr 50 भारतात 9 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon India आणि अधिकृत वेबसाइटद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असेल.
स्मार्टफोन ब्रँड Motorola ने आपल्या आगामी फ्लिप स्मार्टफोन Motorola Razr 50 च्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु लीक आणि रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, या फोनची किंमत 70 ते 80 हजार रुपयांच्या दरम्यान ठेवली जाऊ शकते.
पुढे आलेल्या लीकनुसार, Motorola Razr 50 ची आऊटर स्क्रीन 3.6 इंच लांबीची असेल. यामध्ये डेस्क मोड देखील दिला जाईल. यामध्ये Qualcomm चा शक्तिशाली प्रोसेसर आणि 256GB पर्यंत स्टोरेज दिले जाऊ शकते. तसेच, यात ड्युअल सिम स्लॉट, 5जी, वाय-फाय, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स असतील. त्याबरोरबच, या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. याला विगन लेदर फिनिश दिले जाईल आणि IPX8 रेटिंग देखील मिळेल.