50MP कॅमेरासह Moto G05 फोन भारतात लाँच, अगदी प्रत्येकाच्या बजेटमध्ये आहे किंमत

Updated on 07-Jan-2025
HIGHLIGHTS

Motorola चा नवीन Moto G05 स्मार्टफोन अखेर भारतात लाँच

लेटेस्ट Moto G05 स्मार्टफोन 7000 रुपयांअंतर्गत लाँच करण्यात आला आहे.

हा फोन MediaTek Helio G81 Extreme प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola च्या नव्या Moto G05 स्मार्टफोनच्या लाँचची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. मात्र, अखेर Moto G05 स्मार्टफोन आता भारतात लाँच करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा नवीनतम बजेट स्मार्टफोन आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 5200mAh बॅटरी मिळणार आहे. तसेच, वॉटर प्रोटेक्शनसाठी फोनला IP52 रेटिंग मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Moto G05 फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: 50MP मेन कॅमेरासह Itel चा नवा बजेट स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी

Moto G05 ची किंमत

Motorola ने Moto G05 स्मार्टफोन सिंगल 4GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटमध्ये लाँच केला आहे. कंपनीने या मॉडेलची किंमत 6,999 रुपये इतकी निश्चित केली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 13 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर उपलब्ध होईल. याशिवाय, या फोनमध्ये प्लम रेड आणि फॉरेस्ट ग्रीन हे दोन कलर ऑप्शन्स सादर करण्यात आले आहेत. व्हेगन लेदर फिनिश दोन्ही कलर ऑप्शनच्या मागील बाजूस उपलब्ध आहे.

Moto G05 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Motorola च्या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. तसेच, डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी या फोनमध्ये गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Helio G81 Extreme प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. या चिपसेटसह फोनमध्ये कमी बॅटरीमध्ये मित्रांसह व्हिडिओ चॅट करणे, ऑनलाइन गेम खेळणे, तुमचे आवडते चित्रपट स्ट्रीम करणे आणि इ. मल्टीटास्किंग सोपी होईल.

याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेऱ्यात तुम्हाला पोर्ट्रेट मोड आणि ऑटो नाईट व्हिजन मोड मिळत आहे. तर, सेल्फी कॅमेरासाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5200mAh बॅटरी मिळेल, ज्यासोबत तुम्हाला 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. एका चार्जवर हा फोन 2 दिवस काम करेल, असा कंपनीचा दावा आहे. तर, पाण्याच्या प्रतिकारासाठी या फोनमध्ये IP52 रेटिंग मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :