गेल्या आठवड्यात फोन निर्माता कंपनी लेनोवो ने याची घोषणा केली होती कि 1 नोव्हेंबरला Lenovo Z5 Pro जगासमोर येईल. या घोषणेमुळे लेनोवोचे CEO ने लॉन्चिंग इवेंटच्या काउंट-डाउन संबंधित एक पोस्टर जारी केला आहे. जारी केलेल्या या पोस्टर वरूनच स्मार्टफोनच्या काही फीचर्सची माहिती मिळाली आहे. सांगण्यात आले आहे कि लेनोवोच्या या नवीन मॉडेल मध्ये 'हार्डवेयर सिक्योरिटी चिप' चा वापर करण्यात आला आहे. याची अधिकृत पुष्टि पण कंपनीच्या टीजर मधून कार्नाय्त आली आहे. यासोबत मोबाईल फोन मध्ये 'मेकॅनिकल स्लाइडर' पण देण्यात आला आहे. पोस्टर नुसार स्लाइडर साठी Z5 Pro '6 गाइडेन्स सेंसर' सहित 'डबल हेलिक्स' चा वापर करतो. तसेच यावरून समजले आहे कि स्लाइड मॅकॅनिज्म 300,000 वेळा पेक्षा जास्त वापरता येईल. OPPO Find X मधील ऑटोमेटेड स्लाइडर प्रमाणे Lenovo Z5 Pro चा स्लाइडर मॅकॅनिज्म आहे.
त्याचबरोबर या पोस्टर वरून स्मार्टफोनच्या अजून डिटेल्सची माहिती मिळाली आहे यात तुम्हाला ड्यूल फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात येत आहे. सोबतच तुम्हाला ड्यूल रियर कॅमेरा पण देण्यात आला आहे. हे सर्व कॅमेरा स्मार्टफोन मध्ये वर्टीकल पोजीशन मध्ये लावण्यात आले आहेत. फिंगरप्रिंट स्कॅनर साठी कोणतीही जागा देण्यात आली नाही ज्याचा अर्थ असा कि यात अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असू शकतो.
लेनोवो ने जारी केलेल्या दुसऱ्या पोस्टर वरून खुलासा झाला आहे कि Lenovo Z5 Pro मध्ये 'हार्डवेयर लेवल सिक्योरिटी एन्क्रिप्शन' साठी एक चिपसेट असेल. मोबाईल फोन मध्ये हे फिचर बिज नेसमेन आणि प्रोफेशनल्सना लक्षात ठेऊन देण्यात आले आहे ज्यांना एक असा फोन हवा आहे ज्यात हाई-लेवल सिक्योरिटी असेल. या पोस्टर मध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात एक चिपसेटची इमेज दाखवण्यात आली आहे ज्यावर “Turbo” लिहिण्यात आली आहे. त्यावरून अशी अशा आहे कि ओप्पोच्या 'हाइपर बूस्ट टेक्नोलॉजी' प्रमाणे या फोन मध्ये पण 'सॉफ्टवेयर परफॉरमेंस इम्प्रूवमेंट फीचर' टाकण्यात आला आहे.
या फोन मध्ये तुम्हाला 6.5 इंचाचा (2280 x 1440) डिस्प्ले मिळत आहे. हा डिवाइस Snapdragon 845 प्रोसेसर वर चालतो. स्टोरेज बद्दल बोलायचे तर यात तुम्हाला 6GB/8GB RAM सह 64GB/128GB/256GB इंटरनल स्टोरेज मिळेल. तसेच असे बोलले जात आहे कि फोन मध्ये 4,000mAh क्षमता असलेली बॅटरी असेल. भारतात या स्मार्टफोनची किंमत जवळपास 18,990 रुपए असू शकते असा अंदाज लावला जात आहे.