lava shark
देशी कंपनी Lava ने पुन्हा एकदा जबरदस्त फोन आपल्या युजर्ससाठी सादर केला आहे. Lava ने वापरकर्त्यांसाठी एंट्री लेव्हलचा स्वस्त स्मार्टफोन बाजारात सादर केला आहे. हा नवीन मोबाईल शार्क सिरीज अंतर्गत ‘Lava Shark’ या नावाने भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. यामध्ये कमी किमतीत तुम्हाला 50MP AI रियर कॅमेरा, 5000mAh बॅटरी सारखे पॉवरफुल फीचर्स मिळतील. जाणून घ्या Lava Shark फोनची किंमत, फीचर्स आणि संपूर्ण तपशील-
Also Read: Realme P3 Ultra Sale: लेटेस्ट स्मार्टफोनची पहिली सेल आज! जाणून घ्या ऑफर्स आणि आकर्षक फीचर्स
Lava चे बजेट स्मार्टफोन नक्कीच भारतीय ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. कंपनीने लावा शार्क फोन 6,999 रुपये किमतीत लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनमध्ये टायटॅनियम गोल्ड आणि स्टेल्थ ब्लॅक असे दोन कलर ऑप्शन्स मिळतील. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन ऑफलाईन मार्केटमध्ये विक्रीसाठी लवकरच उपलब्ध होऊ शकतो.
Lava Shark फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये पंच-होल कटआउट देखील उपलब्ध आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Unisoc T606 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 4GB रॅम आणि 4GB व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो. फोनची स्टोरेज क्षमता 64GB पर्यंत आहे. फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 256GB पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP AI कॅमेरा आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यासोबत तुम्हाला 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर 45 तासांपर्यंतचा टॉकटाइम देतो, असा कंपनीचा दावा आहे. फोनला वॉटर रेझिस्टन्ससाठी IP54 रेटिंग आहे.