टेलिकॉम मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी रिलायन्स Jio ने आपल्या ‘Jio Bharat सीरिज’ मध्ये नवा परवडणारा 4G फिचर फोन लाँच केला आहे. या फोन्ससह कंपनीने इतर मोबाईल ब्रँड्ससमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या सिरीजअंतर्गत आज मुकेश अंबानी यांच्या कंपनीने दोन नवीन मोबाईल फोन सादर केले आहेत. होय, Jio Bharat V3 आणि Bharat V4 भारतात लाँच करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात किंमत आणि सविस्तर तपशील-
Jio Bharat V3 ची किंमत 1,099 रुपये इतकी आहे. तर, Jio Bharat V4 ची किंमत 1,099 रुपये इतकी निश्चित केली गेली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, JioBharat V3 आणि V4 हे इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह स्वस्त 4G फीचर फोन आहेत. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या दोन्ही स्मार्टफोन्सची विक्री लवकरच सुरु होईल. तुमच्या जवळच्या रिटेल स्टोअर्स, मोबाईल शॉप्स तसेच ऑनलाइन शॉपिंग साइट Amazon आणि JioMart वरून नवे फोन्स खरेदीसाठी उपलब्ध असतील.
Also Read: Jio New 5G Plans: अमर्यादित डेटासह दोन नवे प्लॅन्स लाँच, जाणून घ्या किंमत आणि संपूर्ण बेनिफिट्स
Jio Bharat V3 आणि Jio Bharat V4 4G फोनमध्ये 128 GB मेमरी कार्ड इन्स्टॉल केले जाऊ शकते. यासह या बटन फोनमध्ये अनेक व्हिडिओ आणि गाणी लोड करता येतील. विशेष म्हणजे JioBharat V3 आणि V3 मध्ये 23 भारतीय भाषांचे समर्थन मिळेल. ज्यामुळे, वापरकर्ते त्यांच्या सोयीच्या भाषेत फोन ऑपरेट करू शकतात. नव्या 4G फीचर फोन Bharat V3 आणि Bharat V4 मध्ये 1,000 mAh बॅटरी आहे. ज्यासह तुम्ही हा फोन दीर्घकाळापर्यंत निश्चिंतपणे चालवू शकता.
इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Jio Bharat V3 आणि Jio Bharat V4 4G फोनमध्ये JioTV, JioCinema, JioPay आणि JioChat चे ऍक्सेस मिळेल.
JioTV: या फोनमध्ये 455 हून अधिक टीव्ही चॅनेल लाईव्ह प्ले केले जाऊ शकतात. ड्रामा, चित्रपट, बिग बॉससारखे शो, न्यूज आणि क्रिकेटचे मॅचेसचा आनंद घेता येईल.
JioCinema: JioCinema ॲप केवळ Jio Bharat 4G फोनमध्ये उपलब्ध आहे. यावर ऑनलाइन चित्रपट, व्हिडिओ आणि शो इ. पाहता येतील.
JioPay: जिओ फोन युजर्सना यावरून पेमेंट देखील करता येईल. एवढेच नाही तर, या फोनमध्ये एक इन-बिल्ट साउंड बॉक्स देखील आहे, जो वापरकर्त्यांना पैसे पाठवताना किंवा स्वीकारताना देखील माहिती देईल.
JioChat: JioChat ॲपद्वारे, मित्रांना किंवा कुटुंबियांना मॅसेजेस, व्हॉइस मेसेजिंग आणि फोटो देखील पाठवले जाऊ शकतात. यामध्ये एक चॅटिंग ग्रुप देखील तयार करता येईल.
रिलायंस Jio चे नवे Jio Bharat फिचर फोन लाँच करणे, हे एक क्रांतिकारी पाऊल आहे. यामुळे भारतातील लाखो 2G फीचर फोन वापरकर्त्यांपर्यंत 4G ची पॉवर पोहोचली आहे. हे केवळ एक उत्पादन नाही, तर एक मिशन आहे जे डिजिटल विभाजन कमी करण्याचा प्रयत्न करते. तंत्रज्ञान हा प्रत्येक भारतीयासाठी विशेषाधिकार नसून मूलभूत अधिकार बनवण्याचा प्रयत्न करते.