Apple च्या आगामी सिरीजची चर्चा टेक विश्वात अनेक दिवसांपासून सुरु आहे. अखेर, Apple पुढील महिन्यात बहुप्रतीक्षित iPhone 16 सीरीज लाँच करणार आहे. लाँचपूर्वीच या फोनबद्दल बरीच माहिती आणि लीक्स पुढे येत आहेत. ताज्या लीक्समध्ये iPhone 16 सीरीजच्या फोन्सचे खास स्पेसिफिकेशन्सही समोर आले आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो की, या वर्षी कंपनी नेक्स्ट जनरेशन iPhone सीरीज अनेक अपग्रेड्ससह आणत आहे, ज्यामध्ये कॅप्चर बटण देखील समाविष्ट आहे. ताज्या लीकमध्ये iPhone 16 आणि iPhone 16 Pro मधील अपग्रेड केलेल्या कॅमेरा सिस्टम आणि कॅप्चर बटणविषयी नवीनतम माहिती पुढे आली आहे.
Also Read: Jio New Plans: भारी बेनिफिट्ससह कंपनीने लाँच केले अनेक नवीन प्लॅन्स, ‘या’ युजर्सची तर मज्जाच मजा!
ताज्या लीकनुसार, iPhone 16 आणि iPhone 16 Plus फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. तथापि, या वर्षी येणाऱ्या फोनमध्ये iPhone 12 प्रमाणे व्हर्टिकल कॅमेरे असतील. फोनमध्ये 48MP प्राथमिक कॅमेरा आणि 2x ऑप्टिकल झूम, एक अल्ट्रा-वाइड सेन्सर असेल, जो चांगल्या F/2.2 अपर्चरसह 0.5x झूमसह मिळेल. यामुळे लो लाईटमध्ये देखील अधिक उत्तम फोटोज कॅप्चर करता येतील.
त्याबरोबरच, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max पहिल्या पिढीप्रमाणे तीन कॅमेरा सेन्सर असतील. यात 48MP मुख्य सेन्सर, अल्ट्रा वाइड सेन्सरसह टेलिफोटो लेन्स असेल. जे 2x ऑप्टिकल झूम आणि f/1.78 अपर्चरला सपोर्ट करेल. तसेच, हे दोन्ही फोन 5X टेलिफोटो लेन्ससह येतील.
प्रो मॉडेलमध्ये अल्ट्रा वाइड सेन्सर अपग्रेड केला जाईल. या फोनमध्ये 48MP अल्ट्रा-वाइड सेन्सर असेल. तसेच, iPhone 16 सिरीज JPEG-XL नावाच्या नवीन इमेज फॉरमॅटसह येईल. जी HEIF, JPEG, HEIF Max, ProRAW आणि ProRAW Max सारख्या विद्यमान फॉरमॅटमध्ये सामील होणार आहे. एवढेच नाही तर, प्रो मॉडेल डॉल्बी व्हिजनसह 120 फ्रेम्स प्रति सेकंद 3K व्हिडिओ रेकॉर्डिंगला समर्थन देईल. मात्र, लक्षात घ्या की, iPhone 16 सीरिजच्या फोनबद्दल खात्रीशीर माहिती फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येईल.