HMD Crest मोबाईलची भारतीय लाँच डेट कन्फर्म! मिळेल आकर्षक फोटोग्राफीचा अप्रतिम अनुभव 

HMD Crest मोबाईलची भारतीय लाँच डेट कन्फर्म! मिळेल आकर्षक फोटोग्राफीचा अप्रतिम अनुभव 
HIGHLIGHTS

HMD Crest नव्या स्मार्टफोन सिरीजचे भारतीय लाँच कन्फर्म

क्रेस्ट सीरिज अंतर्गत HMD Crest आणि HMD Crest Max स्मार्टफोन्स होणार लाँच

HMD च्या नवीन स्मार्टफोन्ससाठी मायक्रोसाइट ऑनलाइन शॉपिंग साइट Amazon वर लाइव्ह

HMD ने अलीकडेच आपले स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यास सुरुवात केली आहे. HMD Pulse एप्रिलमध्ये जागतिक स्तरावर लॉन्च केले गेले होते. त्यानंतर, कंपनीने अखेर आपल्या नव्या स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची तारीख शेअर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन मोबाईल ब्रँडच्या क्रेस्ट सीरिज अंतर्गत HMD Crest आणि HMD Crest Max या नावांनी लाँच केले जातील.

एवढेच नाही तर, नव्या HMD Crest सिरीजच्या स्मार्टफोन्सची माहिती ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर देण्यात आली आहे. चला तर मग HMD Crest सिरीजचे टीझर आणि इतर तपशील सविस्तरपणे जाणून घेऊयात-

Also Read: Xiaomi चा पॉवरफुल टॅबलेट लवकरच होणार लाँच! Redmi Pad Pro 5G ‘या’ दिवशी होणार दाखल

HMD Crest स्मार्टफोन सिरीजचे भारतीय लॉंचिंग

HMD च्या नवीन स्मार्टफोन्ससाठी मायक्रोसाइट ऑनलाइन शॉपिंग साइट Amazon वर लाइव्ह करण्यात आली आहे. लिस्टिंगनुसार, 25 जुलै रोजी डिव्हाइस भारतात दाखल होणार आहे. कंपनीने अधिकृत X म्हणजेच ट्विटर हॅन्डलवर देखील या फोनच्या लाँचबाबत माहिती शेअर केली आहे. साइटवर फोनचे नाव दिलेले नसले तरी HMD Crest आणि HMD Crest Max असे दोन फोन क्रेस्ट सीरिजमध्ये लाँच होणार हे जवळपास निश्चित आहे, असे सांगण्यात येत आहे.

HMD Crest सिरीजचे Amazon लिस्टिंग

Amazon च्या मायक्रोसाइटवरून आगामी स्मार्टफोन सिरीजबद्दल माहिती मिळाली आहे. त्यानुसार, HMD Crest स्मार्टफोन ग्लास बॅक फिनिशसह उपलब्ध असतील. एचएमडी क्रेस्ट स्मार्टफोनची पोस्टरमध्ये तुम्ही बघू शकता की, डिझाईन पूर्णपणे उघड झाली नाही. परंतु, Amazon वर फोनची झलक पाहता येईल. स्मार्टफोनमध्ये गोलाकार कॅमेरा मॉड्यूल आणि सेल्फी कॅमेऱ्यासाठी पुढील बाजूस पंच होल कटआउट असणे अपेक्षित आहे.

HMD Crest नव्या स्मार्टफोन सिरीजचे भारतीय लाँच कन्फर्म

तसेच, फोटोग्राफीच्या उत्तम अनुभवासाठी परिपूर्ण पोट्रेट कॅप्चर करण्याची सुविधा फोनमध्ये दिली जाईल. विशेष म्हणजेच HMD क्रेस्ट स्मार्टफोनची डिझाईन अशा प्रकारे केली गेली आहे की, “वापरकर्ते ते स्वत: च दुरुस्ती (सेल्फ रिपेयर) करू शकतील”, अशी महत्त्वाची माहिती मिळाली आहे. हे स्मार्टफोन्स सुपरफास्ट आणि स्टेबल परफॉर्मन्स देतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo