नवे HMD 105 4G आणि HMD 110 4G फीचर फोन लाँच, किंमत केवळ 2,199 रुपयांपासून सुरू

नवे HMD 105 4G आणि HMD 110 4G फीचर फोन लाँच, किंमत केवळ 2,199 रुपयांपासून सुरू
HIGHLIGHTS

HMD ने नवे HMD 105 4G आणि HMD 110 4G भारतात लाँच केले.

HMD 105 4G नव्या फिचर फोनची किंमत 2,199 रुपये आहे.

नव्या 4G फिचर फोनच्या मदतीने तुम्हाला कोणत्याही QR कोडवर कधीही, कुठेही पेमेंट करता येईल.

Nokia फोन निर्माता कंपनी HMD आता सावकाशरित्या भारतात आपले पोर्टफोलिओ मजबूत करत आहे. आता कंपनीने काही काळापूर्वी HMD 105 आणि HMD 110 2G फीचर फोन लॉन्च केले होते. त्यानंतर, आता इतर कंपन्यांच्या 4G फोनला टक्कर देण्यासाठी HMD 105 4G आणि HMD 110 4G भारतात लाँच करण्यात आले आहेत. कंपनीनुसार, आधुनिक सुविधा आणि मनोरंजन आवडणाऱ्या ग्राहकांना लक्षात घेऊन हे नवीन फोन तयार करण्यात आले आहेत.

Also Read: जबरदस्त AI फीचर्ससह भारतात दाखल होणार Infinix Zero 40 5G फोन, पहा लाँच डेट आणि सर्व तपशील

विशेष म्हणजे या फिचर फोनमध्ये तुम्ही क्लाउड फोन ॲपद्वारे YouTube, YouTube Music आणि YouTube Shorts सहज पाहण्यास सक्षम असाल. कंपनीने सांगितले की, फोनमधील प्रीलोडेड ॲप सुरक्षित UPI व्यवहार प्रदान करतो. या 4G फोनच्या मदतीने तुम्हाला कोणत्याही QR कोडवर कधीही, कुठेही पेमेंट करता येईल.

HMD 105 4G and HMD 110 4G launched

HMD 105 4G आणि HMD 110 4G फिचर फोनची किंमत

HMD 105 4G नव्या फिचर फोनची किंमत 2199 रुपये आहे. हा फोन ब्लॅक, ब्लूईश आणि पिंक कलर ऑप्शन्समध्ये येतो. तर, दुसरीकडेह HMD 110 4G हा फिचर फोन टायटॅनियम आणि ब्लू कलर ऑप्शन्ससह येतो. या फोनची किंमत 2,399 रुपये आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे फोन रिटेल स्टोअर्स, ई-कॉमर्स साइट्स आणि HMD.com वरून उपलब्ध असतील.

HMD 105 4G आणि HMD 110 4G फिचर फोनचे तपशील

HMD 105 4G आणि HMD 110 4G या दोन्ही फोनमध्ये 2.4-इंच लांबीचा IPS QVGA डिस्प्ले आहे. तसेच, पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 1450mAh बॅटरी आहे जी 11.8 तासांचा टॉकटाइम आणि 386 तासांचा स्टँडबाय टाइम प्रदान करते. विशेष बाब म्हणजे फोनमध्ये टाइप-C चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये मायक्रो-USB पोर्ट देखील मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे दोन्ही फोन FM रेडिओ वायर्ड आणि वायरलेस मोडसह येतात. म्हणजे तुम्ही तुमचे हेडफोन कनेक्ट न करता FM रेडिओ ऍक्सेस करू शकता.

HMD 110 4G
HMD 110 4G

एवढेच नाही तर, फोनमध्ये MP3 प्लेयर, वायरलेस FM रेडिओ, 32GB SD कार्ड सपोर्ट आणि फोन टॉकर आहे. ते 23 भाषा आणि 13 इनपुट भाषा देतात. याव्यतिरिक्त, फोनमध्ये 3-इन-1 स्पीकर आहे आणि 3.5 मिमी हेडफोन जॅकसह येतो. तर, कंपनी फोनसाठी 1 वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी देखील देणार आहे. याशिवाय, Nokia 110 4G फोनमध्ये मागील बाजूस QVGA रियर कॅमेरासह हाय पॉवर LED फ्लॅश लाइट आहे. मात्र, Nokia 105 4G मध्ये कॅमेरा नाही.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo