नवा CMF Phone 1 फक्त 12,999 रुपयांमध्ये Flipkart वर उपलब्ध, खरेदी करणे योग्य ठरेल का?

Updated on 24-Sep-2024
HIGHLIGHTS

Flipkart Big Billion Days सेल 27 सप्टेंबरपासून प्रत्येकासाठी सुरू होईल.

सेलदरम्यान सर्वात रोमांचक डील अलीकडेच लाँच झालेल्या CMF Phone 1 वर असेल.

CMF फोन 1 जुलैमध्ये 15,999 रुपयांच्या बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे.

प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart ची वर्षातील सर्वात मोठी सेल Flipkart Big Billion Days सेल 27 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. लक्षात घ्या की, Flipkart Big Billion Days सेल 27 सप्टेंबरपासून प्रत्येकासाठी सुरू होईल, तर Flipkart Plus सदस्यांना 26 सप्टेंबरला लवकर प्रवेश मिळेल. या वर्षातील सर्वात रोमांचक डील अलीकडेच लाँच झालेल्या CMF Phone 1 वर आहे, जो या सेलदरम्यान केवळ 12,999 रुपयांच्या प्रभावी किमतीत उपलब्ध असेल. जर तुम्हाला बजेट स्मार्टफोन हवे असेल, तर ही तुमच्यासाठी भारी ऑफर आहे.

Also Read: TECNO POP 9 5G: अनेक Powerful फीचर्ससह नवा बजेट फोन भारतीय बाजरात लाँच, किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी

CMF Phone 1 डील

Flipkart Big Billion Days सेलदरम्यान, तुम्ही फ्लिपकार्ट आणि निवडक रिटेल स्टोअर्सवर CMF Phone 1 सवलतीसह खरेदी करू शकता. CMF फोन 1 जुलैला 15,999 रुपयांच्या बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला होता. पण आता सणासुदीच्या काळात हा फोन 12,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असेल. या ऑफरमध्ये तुम्हाला कंपनीकडून 2,000 रुपयांची सूट आणि 1000 रुपयांची बँक सूट मिळणार आहे. मात्र, अशा सवलती मर्यादित काळासाठी लाईव्ह असतात, त्यामुळे हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला घाई करावी लागेल.

CMF Phone 1 खरेदी करणे योग्य ठरेल का?

CMF फोन 1 त्याच्या कस्टमाइझेबल डिझाइनसह युनिक आहे. वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हाइसचे स्वरूप वैयक्तिकृत करण्यास अनुमती मिळते. फोन क्लीन आणि ब्लोटवेअर-फ्री सॉफ्टवेअर एक्सपेरियन्ससह येतो, ज्यामुळे नेव्हिगेट करणे सोपे होते. MediaTek Dimensity 7300 SoC सह सुरळीत कार्यक्षमतेसह, CMF फोन 1 दैनंदिन कामांसाठी उत्तम कार्यप्रदर्शन दर्शवतो. तर, दुसरीकडे, CMF Phone 1 चे डिझाइन अद्वितीय असले तरी, बिल्ड कॉलिटी जरा बेसिक वाटते. त्याबरोबरच, तुम्हाला बॉक्समध्ये चार्जर देखील मिळत नाही. तुम्हाला स्वतंत्रपणे चार्जर खरेदी करावे लागेल.

CMF Phone 1 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

CMF फोन 1 मध्ये 6.67-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. चांगल्या कामगिरीसाठी, हा फोन MediaTek Dimensity 7200 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये ड्युअल-रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी शूटर आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. तर, तुम्हाला 12MP चा सेल्फी शूटर देखील मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 33W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरीसह येतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :