Realme ने आजपासून भारतात नवीन स्मार्टफोन सिरीज ‘Realme P series’ लाँच केली आहे. या सिरीजमधील P चा अर्थ म्हणजे Powerful असा होय. या सिरीजअंतर्गत भारतात Realme P1 5G आणि Realme P1 Pro 5G हे दोन मोबाईल फोन लाँच करण्यात आले आहेत. हे दोन्ही फोन कमी किमतीत अप्रतिम फीचर्स आणि स्पेसिफिकेशनसह येतात. ही सिरीज भारतात बजेट विभागात सादर करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात Realme च्या नव्या सिरीजची किंमत आणि सर्व तपशील-
Realme P1 5G फोन दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याच्या बेस मॉडेलमध्ये 6GB+128GB स्टोरेज आहे, ज्याचा दर 15,999 रुपये आहे. तर, फोनचा 8GB+ 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो, ज्याची किंमत 18,999 रुपये आहे.
यावतिरिक्त, Realme P1 Pro चे 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंट 19,999 रुपयांना आणि 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 20,999 रुपयांना उपलब्ध होईल. फोनची अर्ली बर्ड सेल आज म्हणजेच 15 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता Flipkart वर सुरू होईल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या Realme मोबाईलची विक्री Flipkart या शॉपिंग साइटवर होईल.
Realme P1 5G फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्लेवर लाँच करण्यात आला आहे, जो AMOLED पॅनेलवर बनवला आहे, 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. सुरक्षिततेसाठी फोनमध्ये इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळेल. तर, Realme P1 Pro मध्ये 6.7 इंच लांबीचा OLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश दर 120Hz आहे.
Realme P1 5G फोन MediaTek Dimensity 7050 octa-core प्रोसेसरवर लॉन्च करण्यात आला आहे. Realme P1 Pro मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 प्रोसेसर आहे.
Realme P1 5G फोन 8 GB व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो, जो फोनच्या फिजिकल रॅमसह 16 GB पर्यंत वाढवतो. या फोनमध्ये 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे स्टोरेज microSD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. Realme P1 Pro मध्ये अखंड कार्यासाठी 8GB RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे.
Realme P1 फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर 50MP चा Sony LYT600 सेन्सर प्रदान केला आहे, जो 2MP ब्लॅक अँड व्हाइट सेन्सरसह कार्य करतो. या फोनमध्ये F/2.45 अपर्चरसह 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
याव्यतिरिक्त, Realme P1 Pro मध्ये उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी यात 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा आहे.
Realme P1 5G फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करेल. यासह फोन 0 ते 50% पर्यंत फक्त 28 मिनिटांत आणि 65 मिनिटांत 100% पूर्ण चार्ज होऊ शकते, असा कंपनीने दावा केला आहे. या फोनमध्ये OTG रिव्हर्स चार्जिंग देखील उपलब्ध आहे. तर, Realme P1 Pro मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करते.