Itel चा नवीन स्मार्टफोन itel S24 स्मार्टफोन भारतीय बाजारात अखेर लाँच झाला आहे. हे कमी किमतीत दमदार फीचर्ससह आणले गेले आहे. हा स्मार्टफोन कंपनीने बजेट सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. फोनच्या विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 108MP मुख्य कॅमेरा आहे. हा फोन दोन रंगात आणण्यात आला आहे. Itel च्या या हँडसेटमध्ये ॲटम स्टोरेज तंत्रज्ञान उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊयात स्मार्टफोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-
हे सुद्धा वाचा: Good News! OnePlus Nord CE3 फोनच्या किमतीत तब्बल 4000 रुपयांची मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News
itel S24 स्मार्टफोन 10,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. लॉन्च ऑफर अंतर्गत, हे 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केले गेले आहे. कंपनीने हा फोन फक्त एकाच प्रकारात लॉन्च केला आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर आजपासून फोनची विक्री सुरू झाली आहे. हा स्मार्टफोन भारतात इनडोअर लाइट आणि सनलाइट या दोन कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला आहे. येथून खरेदी करा
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोन 6.6 इंच लांबीच्या HD+ डिस्प्लेने सुसज्ज आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. सेल्फी कॅमेरासाठी डिस्प्लेवर पंच होल कटआउट आहे. स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी, या फोनमध्ये Octa Core MediaTek Helio G91 प्रोसेसर आहे. यासह तुम्हाला अप्रतिम स्मार्टफोन एक्सपेरियन्स मिळेल.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 108MP AI ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन 8MP फ्रंट कॅमेराने सुसज्ज आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. फोन AI स्मार्ट चार्जला देखील सपोर्ट करतो. या फोनची बॅटरी स्टँडबायवर 49 दिवस टिकू शकते. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हँडसेट अल्ट्रा क्लिअर ध्वनी गुणवत्ता प्रदान करतो. फोनमध्ये ड्युअल DTS स्पीकर्स देण्यात आले आहेत.