अलीकडेच देशी कंपनी Lava ने आपल्या आगामी स्मार्टफोनच्या लाँचची घोषणा केली होती. हा नवीन स्मार्टफोन Lava O2 या नावाने बाजारपेठेत दाखल होणार आहे. अखेर कंपनीने या स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर केली आहे. Lava ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, कंपनीची वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट Amazon वर ही माहिती दिली आहे. फोनचे काही प्रमुख फीचर्स देखील शेअर केले आहेत. जाणून घेऊयात फोनचे लॉन्चिंग डिटेल्स आणि इतर सर्व माहिती-
देशी कंपनी Lava ने आपल्या अधिकृत X म्हणजेच Twitter वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी Lava O2 ची लाँच डेट जाहीर केली आहे. हा डिव्हाइस 22 मार्च रोजी दुपारी 12:00 वाजता लॉन्च होईल. लाइव्ह इव्हेंटद्वारे स्मार्टफोनला भारतात लाँच होणार आहे. कंपनीने फोनच्या मायक्रोसाइटला ई-कॉमर्स साइट Amazon वर लाइव्ह देखील केले आहे, ज्यामध्ये फोनचे स्पेसिफिकेशन्सदेखील उघड झाले आहेत.
Amazon मायक्रोसाइटवर मिळालेल्या माहितीनुसार, फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज असेल. तर, डिव्हाइसमध्ये 50MP AI रिअर कॅमेरा आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. त्याबरोबरच, सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओ टीझरनुसार, Lava O2 फोनमध्ये Unisoc T616 चिपसेटचा तपशील देण्यात आला आहे.
Lava O2 स्मार्टफोनमध्ये मोठा 6.5 इंच लांबीचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येईल. तर, फोनमध्ये पंच-होल डिझाइन असलेली स्क्रीन टीझरमध्ये दिसली आहे. त्याबरोबरच, व्हिडिओ टीझरमध्ये असे दिसून आले आहे की, उत्तम परफॉर्मन्ससाठी त्यात Unisoc T616 चिपसेट असेल. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजची सुविधा दिली जाईल.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी Lava O2 फोनच्या कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. यासोबतच या कॅमेऱ्यात LED फ्लॅशदेखील असेल. फोनमध्ये 50MP प्राइमरी कॅमेरा लेन्स आणि AI कॅमेरा दिला जाईल. बॅटरी वर सांगितल्याप्रमाणे 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.