मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2018 च्या पहिल्या दिवशी सॅमसंग, हुवावे, अॅल्काटेल आणि नोकिया सारख्या कंपन्यांनी आपले डिवाइसेस सादर केले आहेत. सॅमसंग ने आपला फ्लॅगशिप डिवाइस Galaxy S9 सादर केला, तर अॅल्काटेल ने जगातील पहिला एंड्राइड ओरियो (गो एडिशन) स्मार्टफोन सादर केला आहे.
सॅमसंग
सॅमसंग ने आपला Galaxy S9 सादर केला. हा नव्या प्रोसेसर सह सादर करण्यात आला आहे. S9 मध्ये 5.8-इंचाचा डिस्प्ले आहे, याच्या मोठ्या वेरियंट मध्ये 6.2-इंचाचा डिस्प्ले आहे.
नोकिया
HMD ग्लोबल ने Nokia 7 Plus, Nokia 6 (2018), Nokia 8 Sirocco, Nokia 1 आणि Nokia 8110 4G फोंस सादर केले आहेत. यासोबतच कंपनी ने सांगितले की नोकिया चे सर्व फोंस फक्त Nokia 2 सोडून एंड्राइड वन प्लॅटफार्म वर चालतील. Nokia 7 Plus 6-इंचाच्या FHD+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर सह 4GB ची रॅम आहे.
हुवावे
हुवावे ने या इवेंट मध्ये कोणताही स्मार्टफोन सादर केला नसला तरी कंपनी ने MateBook X Pro लॅपटॉप आणि MediaPad M5 टॅबलेट सादर केला आहे.
LG
कंपनी ने MWC 2018 मध्ये V30S ThinQ आणि V30S+ ThinQ ला सादर केले आहे. दोन्ही फोंस मध्ये 6GB रॅम आहे, पण LG V30S मध्ये 128GB ची स्टोरेज आणि LG V30S+ मध्ये 256GB ची स्टोरेज आहे.
अॅल्काटेल
कंपनी ने 1X ला सादर केले आहे, जो एंड्राइड ओरियो (गो एडिशन) वर चालणारा पहिला फोन आहे. या एंट्री लेवल स्मार्टफोन मध्ये 5.3-इंचाचा 960 x 480 पिक्सल रेजोल्यूशन वाला डिस्प्ले आहे. यात एक फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. या व्यतिरिक्त कंपनी ने Alcatel 5, 3, 3V आणि 3X ला पण सादर केले आहे.