ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेझॉनवर मिळतेय मोटोरोलाच्या फोनवर उत्कृष्ट सूट

Updated on 02-Mar-2016
HIGHLIGHTS

अॅमेझॉन इंडिया ऑफर असेपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या डेबिट आणि क्रेडिट कार्डसह मोटो डिवाइस खरेदी केल्यास १५०० रुपयापर्यंत अतिरिक्त कॅशबॅक देत आहे.

अॅमेझॉन इंडियावर मोटोरोलाच्या बजेट स्मार्टफोनवर उत्कृष्ट सूट मिळत आहे. मोटोरोलाने अलीकडेच मोटो X फोर्स, मोटो G (जेन ३) आणि मोटो G टर्बो एडिशन ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉनवर भारतात उपलब्ध केले होते.

 

ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर मोटोच्या सर्व डिवाइसवर इनॉग्रल सूट मिळत आहे. हा डिस्काउंट गुरुवार ४ मार्चपर्यंत उपलब्ध आहे. आता अॅमेझॉनवर मोटोचे अजून काही डिवाइससुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहे. मोटो E (जेन २) आणि नवीन मोटो 360 स्मार्टवॉचसुद्धा आता अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

त्याशिवाय अॅमेझॉन इंडिया ऑफर असेपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या डेबिट आणि क्रेडिट कार्डसह मोटो डिवाइस खरेदी केल्यास १५०० रुपयापर्यंत अतिरिक्त कॅशबॅक देत आहे.

ह्या ऑफरविषयी बोलायचे झाले तर, ह्यात मोटो E (जेन २) 4G, मोटोरोला मोटो G (जेन ३) आणि मोटोरोला मोटो G टर्बो एडिशन स्मार्टफोनवर १००० रुपयांची सूट मिळत आहे, तर मोटो 360 वर २००० रुपयाची सूट मिळत आहे.

जर अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध मोटोरोलाच्या दुस-या स्मार्टफोन्सविषयी बोलायचे झाले तर, मोटो E (जेन 2) 4G ५,९९९ रुपयांच्या किंमतीत मिळत आहे. मोटो G (जेन 3) ८जीबी मॉडल ८,९९९ रुपयात आणि 16GB मॉडल ९,९९९ रुपयात मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर मोटो G टर्बो एडिशन ११,९९९ रुपयात मिळत आहे. मोटो 360 (जेन २) 46mm ब्लॅक डायल २१,९९९ रुपयात आणि मोटो 360 (जेन २) 42mm नेच्युरल मेटल डायल १७,९९९ रुपयात मिळत आहे.

हेदेखील वाचा – 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज असलेल्या दोन उत्कृष्ट स्मार्टफोनची तुलना

हेदेखील पाहा- १,००० च्या किंमतीत येणारे सर्वोत्कृष्ट IEM हेडफोन्स (जानेवारी २०१६)

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :