8GB RAM आणि 50MP कॅमेरासह Motorola स्मार्टफोनची लवकरच भारतात एन्ट्री, बघा फीचर्स

8GB RAM आणि 50MP कॅमेरासह Motorola स्मार्टफोनची लवकरच भारतात एन्ट्री, बघा फीचर्स
HIGHLIGHTS

भारतात Moto G82 5G स्मार्टफोन लवकरच दाखल होणार.

स्मार्टफोनची किंमत भारतात 25,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता.

स्मार्टफोनमध्ये 5000mAHची बॅटरी आहे, ज्यासोबत 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

Motorola जवळपास प्रत्येक आठवड्यात नवीन फोन लाँच करत आहे. कंपनी आता लवकरच भारतात Moto G82 5G स्मार्टफोन लाँच करण्याचा विचार करत आहे, असे सांगितले जात आहे. हा स्मार्टफोन नुकताच युरोपियन मार्केटमध्ये लाँच करण्यात आला होता. हा Moto फोन भारतात कधी येईल हे कंपनीकडून अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र, टिपस्टर योगेश बरार दावा करत आहेत की, Moto G82 स्मार्टफोनची घोषणा भारतात 9 जून रोजी  केली जाईल.

 स्मार्टफोनच्या भारतीय वेरियंटमध्ये युरोपीयन मॉडेलप्रमाणेच फीचर्स असण्याची अपेक्षा आहे. 5,000mAh बॅटरी, स्नॅपड्रॅगन 695 SoC, 120Hz डिस्प्ले ही उपकरणाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. चला तर जाणून घेऊयात  Moto G82 5G स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स… 

Moto G82 5G ची भारतात अपेक्षित किंमत

Moto G82 5G ची जागतिक बाजारात EUR 329.99 म्हणजेच अंदाजे  26,500 रुपयांना विक्री होत आहे. पण, भारतीय बाजारपेठेत त्याची किंमत थोडी कमी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या डिव्हाइसची किंमत भारतात 25,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. जेव्हा हे मिड-रेंज डिव्हाइस युरोपमध्ये लाँच केले गेले, तेव्हा हे उपकरण भारतासारख्या इतर बाजारपेठांमध्ये देखील दाखल होणार आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली होती.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स :

 
Moto G82 5G मध्ये 6.6-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, जो फुल HD+ रिझोल्यूशन आणि 120Hz ला सपोर्ट करतो. मिड-रेंज सेगमेंटमध्ये हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळणे, आता सामान्य बाब झाली आहे. हे डिव्हाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटद्वारे समर्थित आहे. 

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. तसेच, यात f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर आहे. मुख्य कॅमेराला ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS)चे देखील सपोर्ट आहे. यात f/2.2 अपर्चरसह 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे. बर्स्ट शॉट, एआर स्टिकर्स, पोर्ट्रेट मोड, नाईट व्हिजन यांसारखे बरेच कॅमेरा फीचर्स डिव्हाइसमध्ये दिलेले आहेत. आकर्षक सेल्फीसाठी समोर 16-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.

या हँडसेटमध्ये पंचहॉल डिस्प्ले डिझाईन आहे. त्याबरोबरच यात 3.5 मिमी हेडफोन जॅकदेखील आहे. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये 5000mAHची बॅटरी युनिट आहे, ज्यात 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. या हँडसेट ला IP52 RETINGदेखील दिली गेली आहे, म्हणजेच हा हँडसेट डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट आहे. हा डिवाइस ड्युअल स्पीकरसह येतो, जो डॉल्बी ATMOSला देखील सपोर्ट करतो.   

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo