Motorola ने G6 च्या लॉन्च च्या आधी रिलीज केला रीडिजाइन कॅमेरा अॅप
हा नवीन अॅप सेक्शंस मध्ये विभाजित केला गेला आहे आणि जुन्या डिवाइसना लवकरच हा अपडेट मिळण्याची शक्यता आहे.
Motorola लवकरच आपले Moto G6 लाइनअप स्मार्टफोंस लॉन्च करणार आहे पण त्याआधी कंपनी ने आपल्या कॅमेरा अॅप चे नवीन रीडिजाइन वर्जन लॉन्च केले आहे. Motorola ने ya अपडेट मध्ये अॅप आइकॉन आणि अॅप च्या फीचर्स मध्ये बदल केले आहे आहेत. हा नवीन आइकॉन आगामी फोंस च्या आइकॉन थीम चा भाग असण्याची शक्यता आहे. अॅप ला तीन सेक्शंस मध्ये विभाजित करण्यात आले आहे, जे स्वाइप करून वापरता येतील. डिफॉल्ट मोड मध्ये फोटो मॉड च आहे, ज्यात टॉप वर चार पर्याय उपलब्ध आहेत. यात HDR टॉगल, फ्लॅश टॉगल, टाइमर आणि ऑटो तसेच मॅन्युअल कॅमेरा मोड मध्ये स्विच करण्यासाठी टॉगल चा समावेश आहे.
मॅन्युअल कॅमेरा मोड मध्ये टॉगल मीटरिंग, वाइट बॅलेंस, शटर स्पीड, ISO आणि एक्स्पोजर सेटिंग चा समावेश आहे. कॅमेरा ला डावीकडे स्वाइप केल्यास तुम्ही वीडियो मोड एक्सेस करू शकाल. तर उजवीकडे स्वाइप करून तुम्ही कॅमेरा चे अन्य पर्याय जसे की पॅनोरमा आणि स्लो मोशन इत्यादी वापरू शकता. Motorola ने कॅमेरा अॅप मध्ये सेटिंग मेन्यू पण बदलला आहे आशा आहे की कंपनी लवकरच आपल्या डिवाइस साठी हा नवीन अपडेट जारी करेल.
Moto G6 लाइनअप बद्दल बोलायचे झाले तर रिपोर्ट नुसार कंपनी 19 एप्रिल ला हे फोंस लॉन्च करू शकते. आधीच्या लीक्स आणि रुमर्स नुसार Moto G6 लाइन अप मध्ये तीन नवीन फोंस Moto G6 Play, Moto G6 Plus आणि Moto G6 चा समावेश असेल. रुमर्स नुसार Moto G6 स्मार्टफोन मध्ये 5.7 इंचाचा HD+ डिस्प्ले असेल ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 18:9 असेल आणि डिवाइस मध्ये स्नॅपड्रॅगन 427, 3/4GB रॅम आणि 32/64GB स्टोरेज असेल. Moto G6 आणि G6 Plus मध्ये क्रमश: स्नॅपड्रॅगन 450 SoC आणि 630 SoC असेल. दोन्ही डिवाइस मध्ये 12MP + 5MP चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आणि 16MP चा फ्रंट कॅमेरा असेल.