Motorola Razr 50 Ultra की इंडिया लाँच डेट कन्फर्म! मिळतील आकर्षक Moto AI फीचर्स 

Motorola Razr 50 Ultra की इंडिया लाँच डेट कन्फर्म! मिळतील आकर्षक Moto AI फीचर्स 
HIGHLIGHTS

Motorola ने अलीकडेच चीनमध्ये Motorola Razr 50 सीरीज लाँच केली आहे.

सिरीजअंतर्गत Motorola Razr 50 आणि Motorola Razr 50 Ultra हे दोन फोन समाविष्ट असतील.

कंपनीने Motorola Razr 50 Ultra च्या भारतीय लाँच डेटची पुष्टी केली.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने अलीकडेच चीनमध्ये Motorola Razr 50 सीरीज लाँच केली आहे. त्याच वेळी, आता या सीरिजचे भारतीय लाँच देखील निश्चित झाली आहे. होय, कंपनीने आगामी स्मार्टफोन सिरीजची लाँच डेट निश्चित केली आहे. ही कंपनीची नवीनतम फ्लिप स्मार्टफोन सिरीज आहे, सिरीजअंतर्गत Motorola Razr 50 आणि Motorola Razr 50 Ultra हे दोन फोन समाविष्ट असतील. जाणून घेऊयात Motorola Razr 50 Ultra चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-

Also Read: Samsung Galaxy M14 5G फोनच्या किमतीत मोठी कपात! 50MP कॅमेरासह मिळतील 6000mAh बॅटरीसारखे मजबूत फीचर्स

Motorola Razr 50 Ultra चे भारतीय लॉन्चिंग

कंपनीने Motorola India च्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हँडलवर Motorola Razr 50 Ultra च्या भारतीय लाँच डेटची पुष्टी करण्यात आली आहे. हा फोन भारतात 4 जुलै रोजी लाँच होणार आहे. कंपनी या दिवशी अल्ट्रा सोबत बेस मॉडेल Motorola Razr 50 देखील सादर करू शकते, असे सांगितले जात आहे. मात्र, सध्या कंपनीने अल्ट्राची लाँच डेट टीज केली आहे.

हा फोन Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध असेल. लाँचपूर्वी या फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट Amazon वर लाईव्ह केली गेली आहे. कंपनीने लॉन्च तारखेसह खुलासा केला आहे की, आगामी फ्लिप सीरीजमध्ये Moto AI फीचर्स दिले जातील. ज्यामध्ये Photomoji, Magic Canvas, Style Sync, Action Shot, Adaptive Stabilization, Horizontal lock सारखी फीचर्स उपलब्ध असतील. Style Sync फिचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या आऊटफिटला मॅचिंग असा बॅकग्राउंड फोटो वापरण्यास सक्षम असाल.

Motorola Razr 50 Ultra चे तपशील

Motorola Razr 50 Ultra चे तपशील

वर सांगितल्याप्रमाणे, Motorola Razr 50 Ultra सीरीजचा एक प्रीमियम फोन असेल, जो आधीच चीनच्या बाजारात लाँच केला गेला आहे. ज्यामध्ये तुम्हाला प्राथमिक डिस्प्लेसह 4-इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले मिळेल, डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 165Hz असेल. तसेच, फोनमध्ये 6.9-इंच लांबीचा LTPO फुल HD+ प्राथमिक कॅमेरा असेल, ज्याचा रीफ्रेश दर 165Hz असेल. हा फोन चांगल्या परफॉर्मन्ससाठी Qualcomm Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरसह सुसज्ज असेल. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP टेलिफोटो सेन्सर आणि 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo