अखेर Motorola Razr 50 स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच
Motorola Razr 50 फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.
Motorola Razr 50 प्री-बुकिंग उद्यापासून Amazon आणि अधिकृत वेबसाइटवर सुरू होणार आहे.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola च्या आगामी Motorola Razr 50 फ्लिप फोनच्या भारतीय लाँचची चर्चा सुरु होती. अखेर Motorola Razr 50 स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. Motorola चा हा फ्लिप फोन लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून विक्रीसाठी उपलब्ध असेल. लक्षात घ्या की, हा स्मार्टफोन फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये येतो, जो तीन कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात लेटेस्ट Motorola Razr 50 ची किंमत आणि सर्व तपशील-
वर सांगितल्याप्रमाणे, Motorola Razr 50 फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये तुम्हाला 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळणार आहे. या फोनची किंमत 49,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, Motorola Razr 50 प्री-बुकिंग उद्यापासून Amazon आणि अधिकृत वेबसाइटवर सुरू होणार आहे.
Motorola Razr 50 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Motorola च्या या फ्लिप फोनमध्ये 6.9 इंच लांबीचा फुल HD+ pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याच्या मुख्य डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120hz इतका आहे. तर, फोनमध्ये 3.6 इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हँडसेटमध्ये 4nm MediaTek Dimensity 7300X प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आणि 8GB व्हर्च्युअल रॅमचा पर्याय आहे. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला जाईल.
फोटोग्राफीसाठी, Motorola Razr 50 फोनच्या मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरा आणि 13MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या मागील बाजूस 32MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. तर, फोनला पॉवर देण्यासाठी, Motorola चा हा फ्लिप फोन 4200mAh बॅटरीने सुसज्ज आहे, जी 33W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.