Motorola Razr 50 First Sale: पहिल्या सेलमध्ये फ्लिप फोनवर भारी Discount, पहा ऑफर्स

Updated on 20-Sep-2024
HIGHLIGHTS

Motorola Razr 50 आपला नवा फ्लिप स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला.

पहिल्या सेलमध्ये फोनवर 5000 रुपयांचे कूपन किंवा विशेष लॉन्च डिस्काउंट उपलब्ध

नवा फ्लिप स्मार्टफोन 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे.

Motorola ने अलीकडेच भारतात Motorola Razr 50 आपला नवा फ्लिप स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. त्यानंतर, आज 20 सप्टेंबर रोजी भारतात या स्मार्टफोनची पहिली सेल सुरु होणार आहे. पहिल्या सेलदरम्यान तुम्हाला हा स्मार्टफोन 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. Amazon वर या फोनचे लँडिंग पेज तयार करण्यात आले आहे. आज दुपारी 12 वाजल्यापासून सेलमध्ये फोन खरेदी करता येईल. चला तर मग जाणून घेऊयात Motorola Razr 50 ची किमत आणि पहिल्या सेलमधील ऑफर्स-

Also Read: OnePlus चे जबरदस्त टॅबलेट्स भारी Discount सह Myntra वर उपलब्ध, पहा अप्रतिम डील्स

Motorola Razr 50 ची किंमत आणि ऑफर्स

नवीनतम Motorola Razr 50 स्मार्टफोनची किंमत 64,999 रुपये इतकी आहे. लाँचच्या वेळीच या फोनची प्री-बुकिंग सुरू झाली होती. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या सेलमध्ये फोनवर 5000 रुपयांचे कूपन किंवा विशेष लॉन्च डिस्काउंट उपलब्ध आहे. त्याबरोबरच, Axis आणि IDFC बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 10,000 रुपयांची झटपट सूट मिळेल. Buy From Here

Motorola Razr 50 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Motorola च्या फ्लिप स्मार्टफोनमध्ये 6.9 इंच फुल HD+ pOLED डिस्प्ले आहे. या मेन डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120hz इतका आहे. तर, या फोनमध्ये 3.6 इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये 4nm MediaTek Dimensity 7300X प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन Android 13 वर कार्य करतो. हा फोन 8GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह केवळ एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याबरोरबच, यात 8GB रॅम व्हर्च्युअल रॅम देखील उपलब्ध आहे.

फोटोग्राफीसाठी Motorola Razr 50 फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याबरोबरच, यात 50MP मुख्य कॅमेरा आणि 13MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर मिळेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. हा फ्लिप फोन 4200mAh बॅटरीने सुसज्ज आहे. हे 33W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे.

फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला जाईल. डिव्हाइस कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शनसह येतो. हा फोन स्प्रिट्ज ऑरेंजम, बीच सँड आणि कोआला ग्रे या तीन कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.

डिस्क्लेमर: या लेखामध्ये संलग्न म्हणजेच एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :