जगातील सर्वात स्लिमेस्ट Motorola Razr 40 ultra भारतात येण्यासाठी सज्ज, बघा लीक्स

Updated on 13-Jun-2023
HIGHLIGHTS

Motorola Razr 40 ultra जगातील सर्वात स्लिमेस्ट फोन असेल.

या फोनला Amazon India मायक्रोसाईटद्वारे लाईव्ह केले आहे.

फोनच्या स्क्रीनसह यूजर्सना HDR+ आणि SGS आय प्रोटेक्शन फीचर मिळू शकतो.

अलीकडेच Motorola ने मार्केटमध्ये आपले नवीन मॉडेल्स म्हणजेच Motorola Razr 40 आणि 40 Ultra लाँच करण्यात आले आहेत. आता कंपनी हे दोन्ही फोन्स भारतीय बाजारात लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा जगातील सर्वात स्लिमेस्ट फोन असेल, असा दावा केला जात आहे. वृत्तानुसार, या फोनला Amazon India मायक्रोसाईटद्वारे लाईव्ह केले आहे. याद्वारे फोनचे स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. 

Motorola Razr 40 ultra चे संभावित स्पेक्स

Motorola Razor 40 Ultra प्रीमियम सेगमेंटमध्ये सादर केला जाईल. Amazon पेजवरून मिळालेल्या माहितीनुसार, 22 जून रोजी फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स समोर येतील. तर, उघड झालेल्या फीचर्स आणि स्पेसीफिकेशन्सबद्दल माहिती पुढे बघा. 

फोनचा आऊटर पॅनल कस्टमाइज्ड शॉर्टकट आणि बऱ्याच ऍप सपोर्टसह येईल. या ऍपचे Amazon वर काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये म्युझिक कंट्रोल, गुगल मॅप नेव्हिगेशन, ऍप नोटिफिकेशन, वेदर विजेट इ.  पर्याय दिसतात.

 मिळालेल्या माहितीनुसार, फोनची आऊटर स्क्रीन 3.6 इंच लांबीची आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz असेल. हा एक POLED डिस्प्ले असेल, ज्याचे रिझोल्यूशन 1056×1066 असेल. त्याबरोबरच, स्क्रीन गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शनद्वारे संरक्षित केली जाईल. फोनच्या आतमध्ये 6.9-इंच लांबीची LTPO स्क्रीन मिळेल, जी 165Hz रिफ्रेश रेटसह येईल. या स्क्रीनसह यूजर्सना HDR+ आणि SGS आय प्रोटेक्शन फीचर मिळू शकतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :