Good News! Motorola Razr 40 Ultra तब्बल 10,000 रुपयांनी स्वस्त, Razr 40 वरही 5000 रुपयांची कपात| Tech News

Good News! Motorola Razr 40 Ultra तब्बल 10,000 रुपयांनी स्वस्त, Razr 40 वरही 5000 रुपयांची कपात| Tech News
HIGHLIGHTS

Motorola ने मागील वर्षी जुलै 2023 मध्ये दोन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्यात आले.

फोन भारतीय बाजारात Motorola Razr 40 आणि Motorola Razr 40 Ultra म्हणून सादर केले गेले.

कंपनीने आपल्या अल्ट्रा मॉडेलच्या किंमतीत 10,000 रुपयांची कपात केली आहे.

Motorola ने मागील वर्षी जुलै 2023 मध्ये दोन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केले. हे दोन्ही फोन भारतीय बाजारात Motorola Razr 40 आणि Motorola Razr 40 Ultra या नावांनी सादर करण्यात आले. लाँच होताच हे स्मार्टफोन अगदी लोकप्रिय झाले. त्याबरोबरच, ब्रँड या फोनवर सतत ऑफर देत राहतो. आता दोन्ही फोनच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. होय, कंपनीने आपल्या अल्ट्रा मॉडेलच्या किंमतीत 10,000 रुपयांनी आणि बेस मॉडेलच्या किंमतीत 5,000 रुपयांनी कपात केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात, या दोन्ही उपकरणांच्या नवीन किमती-

हे सुद्धा वाचा: 108MP कॅमेरासह Tecno Pova 6 Pro 5G अखेर भारतात लाँच, 70W फास्ट चार्जिंगसह Powerful फीचर्स उपलब्ध। Tech News

MOTOROLA RAZR 40 ULTRA AMAZON

Motorola Razr 40 ची नवी किंमत

Motorola ने आपला Motorola Razr 40 स्मार्टफोन 49,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. ज्याची किंमत 5,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे, म्हणजेच आता हा डिवाइस फक्त 44,999 रुपयांना उपलब्ध होईल.

Motorola Razr 40 Ultra ची नवी किंमत

Motorola Razr 40 Ultra बद्दल बोललो तर ब्रँडने या फोनची सुरुवातीची किंमत 79,999 रुपये निश्चित केली होती. या फोनवर 10,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. म्हणजेच, फ्लिप स्मार्टफोन प्रेमी हा फोन फक्त 69,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

एवढेच नाही तर, दोन्ही उपकरणांवर बँक ऑफर, नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज बोनस सारख्या सुविधा देखील दिल्या जात आहेत. हे दोन्ही मोबाइल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

Motorola Razr 40 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Motorola Razr 40 मध्ये 6.9-इंच लांबीचा FHD+ 10-बिट LTPO pOLED डिस्प्ले आहे, यात 144Hz रिफ्रेश रेटसह येतो. या मॉडेलमध्ये 1.5-इंच लांबीचा OLED कव्हर स्क्रीन आहे. ब्रँडने फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 7 Gen 1 चिपसेट स्थापित केला आहे. हा फोन 8GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.

मोबाइलमध्ये OIS आणि लेसर ऑटोफोकससह 64MP प्राथमिक कॅमेरा आणि 120-डिग्री FOV सह 13MP अल्ट्रावाइड लेन्स आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोन 4,200mAh बॅटरीसह सुसज्ज आहे. यात 33W फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 5W वायरलेस चार्जिंग आहे.

Best smartphone deals above ₹60,000 in Amazon Great Indian Festival 2023: Motorola Razr 40 Ultra
Motorola Razr 40 Ultra

Motorola Razr 40 Ultra चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Motorola Razr 40 Ultra flip फोनमध्ये 6.9-इंच लांबीचा FHD+ 10-बिट LTPO polED डिस्प्ले आहे, जो 165Hz रीफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये 3.6-इंचाचा क्विकव्ह्यू पोलइडी कव्हर डिस्प्ले आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटसह येतो. यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शन आहे. हा फ्लिप फोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटसह येतो.

Motorola Razr 40 Ultra मध्ये OIS सह 12MP प्राथमिक कॅमेरा आणि 108-डिग्री FOV सह 13MP अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर, फोनमध्ये 3,800mAh बॅटरी, 30W फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 5W वायरलेस चार्जिंग आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo