digit zero1 awards

Best Deal! Motorola razr 40 मिळतोय 10 हजार रुपयांनी स्वस्त, फक्त ‘या’ वापरकर्त्यांना मिळेल लाभ

Best Deal! Motorola razr 40 मिळतोय 10 हजार रुपयांनी स्वस्त, फक्त ‘या’ वापरकर्त्यांना मिळेल लाभ
HIGHLIGHTS

तुम्ही Motorola razr40 अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता.

फोन बँकेच्या ऑफरसह 10,000 रुपये कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.

10,000 रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस देखील दिला जाईल.

सध्या फोल्डेबल फोनचे युग आणि ट्रेंड सुरु आहे. अनेक लोक फोल्डेबल फोन खरेदी करण्याचा विचार करत असतील. फोल्डेबल फोन लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही Motorola razr40 अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. हा फोन अलीकडेच लाँच करण्यात आला होता. फोनवर अप्रतिम ऑफर्सचा वर्षाव सुरु आहे. 

Motorola razr40 किंमत आणि ऑफर्स: 

Motorola razr40 ची किंमत 59,999 रुपये आहे. हा फोन बँकेच्या ऑफरसह 10,000 रुपये कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. यानंतर हा फोन 49,999 रुपयांना खरेदी करता येईल. ही बँक ऑफर ICICI आणि Axis बँक क्रेडिट कार्डवर दिली जात आहे. तसेच ही ऑफर EMI व्यवहारांवरही उपलब्ध आहे.

moto razr 40

याव्यतिरिक्त, 10,000 रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस देखील दिला जाईल. जर तुम्हाला हा फोन नो कॉस्ट EMI वर खरेदी करायचा असेल तर तुम्हाला 12 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI ऑफर मिळेल. EMI ऑफर अंतर्गत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये द्यावे लागतील. इतकेच नाही तर 43,100 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. मात्र, यासाठी तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असणे आवश्यक आहे, कारण त्यावरून तुमची एक्सचेंज व्हॅल्यू ठरेल. 

Motorola razr40 चे मुख्य तपशील

 प्रसिद्ध फोल्डेबल फोनचा मुख्य डिस्प्ले 6.9-इंच लांबीच्या FHD+ poLED पॅनेलसह येतो. तर आऊटर डिस्प्लेला 1.5 इंच लांबीचा OLED पॅनल देण्यात आला आहे. हे इन्फिनिटी फ्लेक्सिबल डिस्प्लेसह येते. हा फोन Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. Snapdragon 7 Gen 1 मोबाइल प्लॅटफॉर्म हे तुमचे एकूण गेमिंग पॅकेज आहे. हा प्लॅटफॉर्म हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी, तसेच हार्ट-पंपिंग ऑडिओ आणि व्हिज्युअलसह एपिक मोबाइल गेमिंग प्रदान करतो. यात 8GB रॅम आणि 256 जीबी स्टोरेज आहे.

 फोनमध्ये 64 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. यात IOS, लेझर ऑटोफोकस यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. फोनचा दुसरा कॅमेरा 13-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड, मॅक्रो सेन्सर आहे. फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर आहे. फोनमध्ये 4200 mAh बॅटरी आहे, जी 30W टर्बो पॉवर चार्जसह सुसज्ज आहे. या बॅटरीसह तुम्हाला सारखे फोन चार्ज करत राहण्याचे टेन्शन उरणार नाही. 
 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo