Motorola P30 Note चीन मध्ये 5000mAh क्षमता असलेल्या बॅटरी आणि ZUI 4.0 सह लॉन्च

Updated on 05-Sep-2018
HIGHLIGHTS

काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेला Motorola One Power स्मार्टफोन चीन मध्ये P30 Note स्मार्टफोन म्हणून रीब्रँड करून लॉन्च करण्यात आला आहे. पण यात तुम्हाला स्टॉक एंड्राइड मिळणार नाही, हा एंड्राइड 8.1 Oreo सह ZUI 4.0 वर सादर करण्यात आला आहे.

नुकतेच Motorola ने त्यांचे Motorola One आणि Motorola One Power स्मार्टफोन्स IFA 2018 मध्ये सादर केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोंस गूगल च्या एंड्राइड One प्लॅटफार्म वर लॉन्च करण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की या दोन्ही स्मार्टफोन्सना वेळोवेळी OS अपडेट आणि सिक्यूरिटी पॅच मिळणार आहेत. आता कंपनी ने Motorola One Power स्मार्टफोनशी मिळत्याजुळत्या स्पेक्स सह आपला नवीन स्मार्टफोन Motorola P30 Note चीन मध्ये लॉन्च केला आहे. पण हा स्मार्टफोन स्टॉक एंड्राइड ऐवजी ZUI 4.0 वर लॉन्च करण्यात आला आहे. त्याचबरोबर स्मार्टफोन मध्ये एक ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आणि एक नॉच आहे. 

Motorola P30 Note स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या वर्जन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे, याचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट CNY 1,999 म्हणजे जवळपास Rs 20,900 मध्ये आणि 6GB आणि 64GB स्टोरेज वेरिएंट तुम्ही CNY 2,299 म्हणजे जवळपास Rs 24,029 मध्ये विकत घेता येईल. 

Motorola P30 Note चे स्पेसिफिकेशन्स 
Motorola P30 Note स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर हा तुम्ही एका 6.2-इंचाच्या डिस्प्ले सह विकत घेऊ शकता. हा एक FHD+ LCD डिस्प्ले आहे, ज्यात एक 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाली स्क्रीन आहे. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 ओक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे, याव्यतिरिक्त यात तुम्हाला एक 5,000mAh क्षमता असलेली बॅटरी पण मिळत आहे. जी फास्ट चार्जिंग ला पण सपोर्ट करते. 

कॅमेरा पाहता Motorola P30 Note स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 16+5-मेगापिक्सलचा एक रियर कॅमेरा मिळत आहे, त्याचबरोबर तुम्हाला यात एक 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण देण्यात आला आहे. या ड्यूल सिम स्मार्टफोन मध्ये तुम्हाला ब्लूटूथ 5 च्या सपोर्ट व्यतिरिक्त एक 3.5mm चा ऑडियो जॅक पण मिळत आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :