स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट आणि दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च झाला Motorola P30

स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट आणि दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च झाला Motorola P30
HIGHLIGHTS

लॉन्चच्या एक दिवस आधी Motorola P30 चीन मध्ये कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर दिसला होता.

Lenovo ची अधिकृत कंपनी Motorola ने चीन मध्ये आपला Motorola P30 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. लॉन्चच्या एक दिवस आधी Motorola P30 चीन मध्ये कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर दिसला होता. हा स्मार्टफोन आइस वाइट, ब्राइट ब्लॅक आणि अॉरा ब्लू बॅक पॅनल सह लॉन्च करण्यात आला आहे. 

Motorola P30 ची किंमत आणि उपलब्धता
Motorola P30 च्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत CNY1,999 (जवळपास 20,000 रूपये) ठेवण्यात अली आहे, तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट CNY2,099 (जवळपास 21,000 रूपये) मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन चीन मध्ये प्री-ऑर्डर साठी उपलब्ध झाला आहे पण जागतिक स्तरावर याच्या उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. 

Motorola P30 चे स्पेसिफिकेशन्स 
Motorola P30 मध्ये 6.2 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे जो फुल HD+ रेजोल्यूशन सह येतो. डिस्प्लेचा एस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे. हा स्मार्टफोन ओक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट सह येतो ज्याचा क्लॉक स्पीड 1.8 GHz आहे आणि ज्यात एड्रेनो 509 GPU आहे. L मोटोरोला ने डिवाइस 6GB रॅम आणि 64GB/128GB स्टोरेज सह सादर केला आहे. 

ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर फोन मध्ये iPhone X प्रमाणे डुअल-रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात OmniVision चे 16MP + 5MP चे सेंसर्स आहेत. प्राइमरी लेंसचा अपर्चर f/1.8 आणि सेकेंडरी लेंस चा अपर्चर f/2.2 आहे. कॅमेरा PDAF,1080p विडियो शूटिंगच्या क्षमते सह आणि डुअल-टोन LED फ्लॅश सह येतो. डिवाइसच्या फ्रंटला 12MP चा कॅमेरा आहे जो f/2.0 लेंस आणि 1.25 um पिक्सल साइज सह येतो. 

स्मार्टफोनच्या बॅकला फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे जो मोटो लोगो च्या स्वरुपात आहे. फोन एंड्राइड ओरियो 8.0 OS सह ZUI 4.0 वर चालेल. Motorola P30 मध्ये 3.5 mm चा ऑडियो जॅक, बॉटमला USB-C पोर्ट आणि 18W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे तसेच डिवाइस 3,000 mAh च्या बॅटरी सोबत लॉन्च करण्यात आला आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo