मोटोरोलाने आपला Motorola One Vision स्मार्टफोन अनेक देशांमध्ये लॉन्च केला आहे आणि 91mobiles च्या रिपोर्टनुसार कंपनी हा स्मार्टफोन जून मध्ये भारतात लॉन्च करेल. रिपोर्ट नुसार, One Vision ची किंमत Rs 25,000 असू शकते.
या महिन्याच्या सुरवातीला Motorola One Vision ला XT1970-3 मॉडेल नंबर सह ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ची मान्यता मिळाली होती. प्लॅटफार्म वर डिवाइस दिसल्यानंतर असे म्हणता येईल कि डिवाइस भारतीय स्मार्टफोन बाजारात पण लॉन्च केला जाईल. अंदाज लावला जात आहे कि स्मार्टफोनची किंमत Rs 25,000 असेल. सौदी अरेबिया आणि थायलंड मध्ये डिवाइसची किंमत जवळपास 299 euros (~Rs23,500) आहे, तर ब्राजील मध्ये हा BRL 1,999 (~Rs. 34,500) मध्ये विकत घेता येईल.
आता जर याचे स्पेक्स पहिले तर या स्मार्टफोन मध्ये Exynos 9609 चिपसेट देण्यात आला आहे. सोबतच डिवाइस एकाच वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. यात तुम्हाला 21:9 आस्पेक्ट रेश्यो मिळतो. Moto One Vision चा कॅमेरा डिपार्टमेंट पाहता यात तुम्हाला ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या अंतर्गत तुम्हाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळेल, जो f/1.7 अपर्चर सह देण्यात आला आहे. त्यामुळे हा कंपनीचा असा पहिला मोटोरोला डिवाइस आहे जो 48-मेगापिक्सल कॅमेरा सेंसर सह येईल.
तसेच यात 5-मेगापिक्सलचा सेकंडरी डेप्थ सेंसिंग कॅमेरा आहे, जो OIS ला सपोर्ट करतो. डिवाइस मध्ये तुम्हाला Night vision mode पण मिळतो ज्याने तुम्ही शानदार फोटो घेऊ शकता. सोबतच सेल्फी साठी 25-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोन मध्ये Android 9 Pie आहे, जो स्टॉक एक्सपीरिएंस सह येतो. यात 3,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W TurboPower चार्जिंग सपोर्ट सह येते.
स्टोरेज बद्दल बोलायचे तर तुम्हाला यात एकच स्टोरेज वेरिएंट मिळतो जो 4GB रॅम आणि 128GB चा आहे. One Vision मध्ये तुम्हाला 6.3-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो LCD पॅनल आणि HD+ रिजॉल्यूशन सह येतो. विशेष म्हणजे या आस्पेक्ट रेश्योला मोटोरोला ने CinemaVision चे नाव दिले आहे.
कनेक्टिविटी मध्ये तुम्हाला ब्लूटूथ 5.0, USB Type-C पोर्ट, 3.5mm ऑडियो पोर्ट, Dolby Audio सर्टिफिकेशन दिले जाते.