आज भारतात मोटोरोला आपला Motorola One Vision स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी तयार आहे आणि सोबतच कंपनीने आपल्या Motorola One Power मोबाईल फोनची किंमत कमी केली आहे. गेल्यावर्षी कंपनीने आपला हा स्मार्टफोन Rs 15,999 मध्ये लॉन्च केला होता.
याआधी स्मार्टफोनची किंमत कमी करून Rs 14,999 करण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा डिवाइसची किंमत Rs 2,000 ने कमी करण्यात आली आहे. आता स्मार्टफोन फ्लिपकार्ट वर Rs 12,999 मध्ये विकत घेता येईल. एक्सिस बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड द्वारा हा विकत घेतल्यास 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे आणि सोबतच डिवाइस नो कॉस्ट EMI वर पण विकत घेता येईल.
MOTOROLA ONE POWER SPECIFICATIONS
मोटोरोला वन पॉवर मध्ये 6.2 इंचाचा फुल HD+ मॅक्स विजन डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे आणि डिस्प्लेच्या वर नॉच आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 ने सुसज्ज आहे आणि हा एड्रेनो 509 GPU सह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफ़ोन 4GB RAM/64GB स्टोरेज सह येतो.
स्मार्टफोन मध्ये 16MP + 5MP चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो f/2.0 अपर्चर आणि 1.12μm पिक्सल सह येतो. मोटोरोला वन पॉवरच्या फ्रंटला 8MP चा सेंसर आहे आणि हा f/2.2 अपर्चर सह येतो तसेच हा पोर्ट्रेट मोडला सपोर्ट करतो.