या महिन्याच्या सुरवातीला Best Buy कडून US मध्ये त्यांचा पहिला Notch डिस्प्ले असलेला मोटोरोला स्मार्टफोन Motorola One मोबाईल फोन साठी प्री-ऑर्डर ची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. आता पण हा डिवाइस स्टॉक मध्ये आहे आणि तुम्ही हा विकत घेऊ शकता. तसेच यासोबत तुम्हाला हा डिवाइस दोन वेगवेगळ्या रंगात विकत घेण्याची ऑफर पण देण्यात येत आहे. हा मोबाईल फोन वाइट आणि ब्लॅक मध्ये उपलब्ध आहे.
Best Buy ची लिस्टिंग पाहिली असता या मोबाईल फोन साठी म्हणजे Motorola One साठी जवळपास 399.99 डॉलर मागितले जात आहेत. विशेष म्हणजे हि किंमत पाहून असे वाटत आहे हि किंमत गरजेपेक्षा थोडी जास्तच आहे. याच्या एका अपग्रेडेड वर्जन बद्दल बोलायचे झाले तर भारतात हा जवळपास 220 डॉलर मध्ये विकला जात आहे. तसेच याचे स्पेक्स आणि फीचर्स पाहून हा एक मिड-रेंज मोबाईल फोन वाटत आहे आणि तरीही यासाठी इतके जास्त पैसे का घेतले जात आहेत हे कंपनीलाच माहित.
हे मात्र खरे कि फोनची बॅटरी चांगली आहे असे आपण म्हणू शकतो,यात तुम्हाला एक 3000mAh क्षमता असलेली एक बॅटरी मिळत आहे, जी जवळपास तुम्हाला एक दिवसभर पुरेल. पण तुम्हाला अशी बॅटरी आणि असेच स्पेक्स आणि फीचर्स सह जगभरातील बाजारात इतर अनेक स्मार्टफोन्स खूप कमी किंमतीती विकत घेता येतील. भारतीय बाजारबद्दल बोलायचे तर Xiaomi चे असे अनेक डिवाइस आहेत जे कमी किंमतीती पण तुम्हाला कमी किंमतीती पण तुम्हाला चांगले चांगले स्पेक्स देत आहेत.
मोटोरोला वन मोबाईल फोनची एक चांगली बाब म्हणजे हा गूगलच्या एंड्राइड वन प्रोग्रामचा एक भाग आहे. त्यामुळे तुम्हाला गूगल कडून येणारे सर्व अपडेट खूप लवकर मिळतील, आणि याच्या लॉन्च पासून 2 वर्षांपर्यंत तुम्हाला हे अपडेट मिळतील. जरी हा डिवाइस एंड्राइड 8.1 Oreo सह लॉन्च केला गेला असला तरी आता लवकरच याला एंड्राइड 9 पाई चा अपग्रेड दिला जाणार आहे, यावर्षीच्या शेवट पर्यंत तुम्हाला हा अपडेट डाउनलोड कार्याला मिळेल.