AMAZON सेलमध्ये MOTOROLAचा ‘हा’ फोन मिळतोय स्वस्तात, बघा जबरदस्त ऑफर

AMAZON सेलमध्ये MOTOROLAचा ‘हा’ फोन मिळतोय स्वस्तात, बघा जबरदस्त ऑफर
HIGHLIGHTS

Motorola One Fusion + वर मिळतेय मोठी सूट

Amazon सेलमध्ये हा फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी

फक्त रुपये 1,399 भरून हा फोन तुमचा होईल, बघा ऑफर्स

प्रजासत्ताक दिनानिमित्त Amazon Great Republic Day Sale हा सेल AMAZON ई-कॉमर्स साइटवर सुरू आहे. या सेलमध्ये फोन, टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट आणि इतर ऍक्सेसरीजवर एकापेक्षा जास्त सूट देण्यात येत आहे. जर तुम्ही या काळात स्मार्टफोन शोधत असाल, तर आम्ही Amazon चे सर्वोत्कृष्ट डिल्स घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्ही Motorola One Fusion+ मोठ्या सवलतींसह खरेदी करता येईल. बघुयात फोनवरील उपलब्ध ऑफर्स… 

हे सुद्धा वाचा : Tecno Phantom X2 नंतर आता स्वस्त फोन लाँच करणार कंपनी, वाचा डिटेल्स…

ऑफर्स : 

Motorola One Fusion+ च्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे, परंतु 14 टक्के सूट मिळाल्यानंतर ते 18,999 रुपयांना उपलब्ध आहे. हा फोन फक्त 908 रुपये प्रति महिना EMI सह देखील खरेदी केला जाऊ शकतो. येथून खरेदी करा… 

बँक ऑफर अंतर्गत, SBI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर 10 % म्हणजेच 1,250 रुपयांपर्यंत बचत केली जाऊ शकते. एक्सचेंज ऑफरद्वारे जुन्या फोनच्या बदल्यात 17,600 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. मात्र, एक्सचेंज ऑफरचा फायदा एक्सचेंज केल्या जाणार्‍या डिव्हाइसचे मॉडेल आणि स्थिती यावर अवलंबून आहे. एक्सचेंज ऑफर पूर्ण मिळाल्यास फक्त रुपये 1,399 भरून हा फोन तुमचा होईल.

Motorola One Fusion + 

Motorola One Fusion+ मध्ये 1,080×2,340 पिक्सेल आणि 19.5:9 आस्पेक्ट रेशोच्या रिझोल्यूशनसह 6.5-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 730 चिपसेट ने सुसज्ज आहे. तसेच, यात 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 1 TB पर्यंत वाढवता येते.

फोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी आहे, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ 5, वाय-फाय, जीपीएस, 3.5 मिमी ऑडिओ जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ड्युअल सिम सपोर्ट आहे. कॅमेरासाठी, या फोनमध्ये 64 मेगापिक्सेलचा पहिला कॅमेरा, 8 मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा, 5 मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा चौथा कॅमेरा आहे. तर, 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo