मजबूत प्रोसेसरसह Motorolaचा नवीन स्मार्टफोन आज होणार लाँच, किंमत 10 हजारांहूनही कमी
Motorola कडून Moto E32s आज भारतात होणार लाँच
स्मार्टफोनची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी
डिव्हाइस ऑक्टा-कोर MediaTek Helio G37 प्रोसेसरद्वारे समर्थित
Motorola आज भारतात आणखी एक स्मार्टफोन Moto E32s लाँच करण्यासाठी सज्ज आहे. आगामी मोटो स्मार्टफोनची भारतीय किंमत आणि वैशिष्ट्ये आधीच उघड झाली आहेत. Flipkart आणि Reliance Digital सारख्या ई-कॉमर्स साइट्सने आधीच Moto E32S साठी एक सपोर्ट पेज पब्लिश केले आहे. यामध्ये डिव्हाइसबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे सांगण्यात आली आहे. Moto E32s हा एक बजेट स्मार्टफोन आहे, ज्याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल. चला तर जाणून घेऊयात Motorola Moto E32s स्मार्टफोनबद्दल सर्व सविस्तर माहिती…
Moto E32s ची भारतात अपेक्षित किंमत
Moto E32s साठी फ्लिपकार्ट लिस्टमध्ये असे दिसून आले आहे की, डिव्हाइसची किंमत 9,299 रुपये असेल. या किंमतीमध्ये, ग्राहकांना 3GB RAM + 32GB स्टोरेज मॉडेल मिळण्याची शक्यता आहे. तर 4GB + 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत जास्त असण्याची शक्यता आहे. हा बजेट फोन फ्लिपकार्ट आणि इतर ऑनलाइन स्टोअरद्वारे विक्रीला असणार आहे.
हे सुद्धा वाचा: 8GB RAM आणि 50MP कॅमेरासह Motorola स्मार्टफोनची लवकरच भारतात एन्ट्री, बघा फीचर्स
Moto E32s चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Moto E32s मध्ये 90Hz रिफ्रेश रेट, 1600 x 720-पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले आहे. हुड अंतर्गत, डिव्हाइस ऑक्टा-कोर MediaTek Helio G37 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. फोनमध्ये 15W फास्ट चार्जिंगसह 5,000mAhची बॅटरी आहे. त्याबरोबरच, मोटोरोला बॉक्समध्ये 10W चार्जर ऑफर करतोय.
Moto E32s मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 16MP मुख्य कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो शूटर आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8MP फ्रंट कॅमेरा आहे. डिव्हाइस स्लेट ग्रे आणि मिस्टी सिल्व्हर कलर ऑप्शन्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. इतर फीचर्समध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस अनलॉक सपोर्ट, IP52 वॉटर-रेपेलेंट डिझाइन यांचा समावेश आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile