Motorola चा नवा स्मार्टफोन ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच, किंमत असेल 10 ते 15,000 रुपयांअंतर्गत
आगामी स्मार्टफोन Moto G35 5G च्या भारतीय लाँचची घोषणा
Moto G35 5G फोन येत्या 10 डिसेंबर 2024 रोजी भारतात लाँच होणार आहे.
या हँडसेटची किंमत 10 ते 15 हजार रुपयांच्या दरम्यान निश्चित केली जाऊ शकते.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने आपल्या आगामी स्मार्टफोन Moto G35 5G च्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर, कंपनीने आगामी फोनची भारतीय लाँच डेट देखील जाहीर केली. आम्ही तुम्हाला सांगतो की, अवघ्या पुढील आठवड्यात हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे. या फोनची विक्री प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वरून होईल. जाणून घेऊयात Moto G35 5G चे भारतीय लॉन्चिंग तपशील-
Also Read: लेटेस्ट iQOO 13 लाँच होताच iQOO 12 5G वर मिळतोय प्रचंड Discount, भारी ऑफर्ससह उपलब्ध
Moto G35 5G भारतीय लाँच डेट
Get the best of both worlds! A stunning 6.7” FHD+ screen with 120Hz for vivid visuals, protected by the strength of Gorilla Glass 3. A display that looks incredible.
— Motorola India (@motorolaindia) December 4, 2024
Launching 10th December on @Flipkart, https://t.co/azcEfy1Wlo and at leading retail stores.#MotoG35 #ExtraaHai
Motorola चा आगामी स्मार्टफोन Moto G35 5G फोन येत्या 10 डिसेंबर 2024 रोजी लाँच होणार आहे. वर सांगितल्याप्रमाणे, या फोनची विक्री इ-कॉमर्स साईट Flipkart वरून सुरु होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या हँडसेटला वेगन लेदर डिझाइन देण्यात आले आहे. हा फोन Xiaomi, Realme आणि Oppo सारख्या कंपन्यांच्या मध्यम श्रेणीच्या फोन्सना जोरदार स्पर्धा देईल. ते ग्रीन, रेट आणि ब्लॅक कलर ऑप्शन्ससह उपलब्ध असेल. लीकवर विश्वास ठेवला तर, या हँडसेटची किंमत 10 ते 15 हजार रुपयांच्या दरम्यान निश्चित केली जाऊ शकते.
Moto G35 5G चे अपेक्षित तपशील
Flipkart लिस्टिंगमध्ये Moto G35 चे काही फीचर्स उघड झाले आहेत. या फोन 6.7-इंच लांबीचा FHD Plus डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz आणि टच सॅम्पलिंग दर 240Hz आहे. प्रोटेक्शनसाठी त्यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 बसवण्यात आला आहे. त्याबरोबरच, यात व्हिजन बूस्टर आणि नाईट व्हिजन मोड देखील आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये UNISOC T760 चिप देण्यात आली आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या हँडसेटमध्ये 4GB रॅम, व्हर्च्युअल रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज आहे.
याव्यतिरिक्त, उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी या आगामी मोबाईल फोनमध्ये 50MP प्राथमिक आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. याद्वारे 4K व्हिडीओही रेकॉर्ड करता येणार आहे. आकर्षक सेल्फीसाठी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 20W फास्ट चार्जिंगसह सुसज्ज आहे. तसेच, यात डॉल्बी ATMOS सह ड्युअल स्पीकर तसेच Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक, ड्युअल सिम स्लॉट आणि USB टाइप-C पोर्ट सारखे स्पेक्स देण्यात आले आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile