मोटोरोलाने अलीकडेच भारतीय बाजारात आपला नवीन फोन मोटो X फोर्स लाँच केला. कंपनीने भारतात 32GB आणि 64GB अशा दोन प्रकारात लाँच केला होता. लाँचवेळी ह्याच्या 32GB व्हर्जनची किंमत ४९,९९९ रुपये ठेवण्यात आली होती, तथापि आता हा फोन फ्लिपकार्टवर ३४,९९९ रुपयात मिळत आहे. ह्याचाच अर्थ ह्या स्मार्टफोनवर जवळपास १५,००० रुपयांची सूट मिळत आहे. तथापि, फ्लिपकार्टवर ह्याच्या 64GB व्हर्जनवर १६,००० रुपयाची सूट मिळत आहे. ह्याच्या 64GB व्हर्जनची किंमत ३७,९९९ रुपयाच्या किंमतीत खरेदी करु शकता. लाँचवेळी ह्याची किंमत ५३,९९९ रुपये होती.
मोटो X फोर्स स्मार्टफोनमध्ये 5.4 इंचाची QHD 1440×2560 पिक्सेलची डिस्प्ले दिली गेली आहे. आणि कंपनीचा दावा आहे की, ह्याची डिस्प्ले “Shatterproof” आहे, जो तुटू शकत नाही. याचाच अर्थ की, ह्याची डिस्प्ले आपण कितीही उंचावरुन फेकली तरीही, ती तुटू शकत नाही. ह्या डिस्प्लेला अॅल्युमिनियम रिजिड कोर ने बनवले आहे. त्याचबरोबर फ्लेक्सिबल AMOLED स्क्रीन आणि ड्यूल लेअर टचस्क्रीन पॅनलने बनलेली आहे. तसेच हा स्मार्टफोन वॉटर-रिपेलेंट नॅनो कोटिंगसह येतो.
स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 810 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिले गेले आहे, जो 2GHz ची गती देतो. त्याचबरोबर ह्यात आपल्याला 3GB ची LPDDR4 रॅम मिळत आहे. हा स्मार्टफोन आपल्याला 32GB आणि 64GB अशा दोन प्रकारात मिळत आहे. ह्या दोन्ही प्रकारात आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 2TB पर्यंत वाढवू शकतो. स्मार्टफोनमध्ये 3760mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. आणि कंपनीचा दावा आहे की, स्मार्टफोनमध्ये दिली गेलेली बॅटरी वापरल्यावर सुद्धा २ दिवसाचे बॅटरी बॅकअप देते. आणि ही बॅटरी क्विक चार्जलासुद्धा सपोर्ट करते.
हेदेखील वाचा – Creo Mark 1 स्मार्टफोन विक्रीसाठी झाला उपलब्ध
हेदेखील वाचा – तुमच्या फेसबुक खात्यावरील न्यूजफीड लवकरच येणार एका नव्या लूकमध्ये