Motorola Moto One Power Smartphone to launch with a Notch Display: Motorola लवकरच आपला नवीन एंड्राइड वन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, हा डिवाइस मोटो वन पॉवर नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. हा डिवाइस आता काही दिवसांपूर्वी इंटरनेट वर याच्या काही स्पेक्स सह दिसला होता. आता या स्मार्टफोन ची हँड्स-ऑन इमेज समोर आली आहे, यातून समोर येत आहे की हा डिवाइस एका नॉच डिजाईन डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. या इमेज वरून स्मार्टफोन च्या डिजाईन आणि फीचर्स पण समोर आले आहेत.
कंपनी ने आता पर्यंत आपला कोणताही नॉच डिजाईन वाला स्मार्टफोन लॉन्च केला नाही पण आता असे वाटत आहे की हा डिवाइस कंपनी कडून आपला पहिला नॉच डिजाईन वाल्या स्मार्टफोन च्या रुपात लॉन्च केला जाणार आहे. एक नवीन लीक इमेज ज्या बद्दल आम्ही बोलत आहोत, समोर आली आहे. हा TechInfoBit च्या माध्यामातून समोर आमच्या समोर आली आहे. यातून असे पण समोर येत आहे की डिवाइस नॉच डिजाईन सह लॉन्च केला जाणार आहे.
याच्या स्पेक्स बद्दल ही बातमी Techienize च्या माध्यामातून समोर येत आहे. ही एक स्पॅनिश लिस्टिंग आहे, तिथून ही माहिती समोर येत आहे. याचे स्पेक्स लीक झाले आहेतच, तसेच या बद्दल एक इमेज पण समोर आली आहे. हा फक्त नॉच बद्दल ch माहिती देत नाही, तर याच्या माध्यामातून स्मार्टफोन च्या डिजाईन बद्दल पण खुप काही समोर येत आहे. या लीक वरून समोर आले आहे की डिवाइस एका 6.2-इंचाच्या एका मोठ्या डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो, हा एक 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले असेल. फोन मध्ये बॅक वर एक वर्टीकल ड्यूल कॅमेरा सेटअप असेल आणि तिथे एंड्राइड वन ची ब्रांडिंग पण दिसत आहे.
अन्य स्पेक्स आणि फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट सह लॉन्च केला जाणार आहे, याव्यतिरिक्त यात एक 4GB रॅम सह 64GB ची स्टोरेज पण असणार आहे. फोन एक मिड-रेंज स्मार्टफोन च्या रुपात लॉन्च केला जाणार आहे. तसेच यात एक 6.2-इंचाचा FHD+ 1080-x2280 पिक्सल रेजोल्यूशन असलेला 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले असेल. फोन एक 3,780mAh क्षमता असलेली बॅटरी पण असणार आहे. हा एंड्राइड 8.1 Oreo वर चालेल.
वर सांगितल्या प्रमाणे लीक वरून समोर आले आहे की डिवाइस ड्यूल कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाईल, हा डिवाइस एका 12-मेगापिक्सल च्या प्राइमरी कॅमेरा आणि एक 5-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण मिळेल.