मोटोरोलाने गेल्या आठवड्यातच भारतात Moto G72 सादर केला. Moto G72 हा 4G फोन आहे आणि ड्युअल-बँड Wi-Fiला सपोर्ट करतो. आज म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा Moto G72 खरेदी करण्याची संधी आहे. POLED डिस्प्ले Moto G72 सह प्रदान करण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यात तीन रियर कॅमेरेही आहेत. चला जाणून घेऊया Moto G72 चे सर्व फीचर्स, किंमत आणि ऑफर्स…
हे सुद्धा वाचा : भारीच की ! Amazon दिवाळी सेलमध्ये OnePlus 10R च्या किमतीत मोठी कपात, पहा नवीन किंमत
Moto G72 आज प्रथमच Flipkart वरून खरेदी केला जाऊ शकतो. Moto G72 ची किंमत 18,999 रुपये आहे. फोन 128 GB स्टोरेजसह 6 GB रॅम या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. Moto G72 Metroite ग्रे आणि पोलर ब्लू रंगात विक्रीसाठी उपलब्ध आहे. काही बँक कार्ड्ससह, तुम्हाला हा फोन 14,749 रुपये किमतीत खरेदी करण्याची संधी मिळेल. यासोबत 3,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज ऑफरही आहे.
Moto G72 मध्ये Android 12 सह My UX आहे. Moto G72 मध्ये 120Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.6-इंच लांबीचा फुल HD+ पोलेड डिस्प्ले आहे. फोनमध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसरसह 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, Moto G72 मध्ये 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ v5.1, GPS/AGPS सह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. त्याबरोबरच, यामध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 30W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर, तीन रियर कॅमेरे आहेत ज्यात प्राइमरी लेन्स 108 मेगापिक्सेल आहे. तसेच, दुसरी लेन्स 8-मेगापिक्सेल हायब्रिड अल्ट्रा-वाइड अँगल आणि तिसरी लेन्स 2-मेगापिक्सेल मॅक्रो आहे. Moto G72 मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.