Samsung आणि Huawei नंतर आता मोटोरोला पण लॉन्च करेल पंच होल कॅमेरा असलेला फोन

Samsung आणि Huawei नंतर आता मोटोरोला पण लॉन्च करेल पंच होल कॅमेरा असलेला फोन
HIGHLIGHTS

मोटोरोला 2019 च्या सुरवातीला आपल्या Moto P सीरीज अंतर्गत नवीन Moto P40 स्मार्टफोन लॉन्च करू शकते ज्यात लेटेस्ट पंच-होल कॅमेरा डिजाइन देण्यात आली आहे.

महत्वाचे मुद्दे

  • डिवाइस मध्ये असेल 48MP चा रियर कॅमेरा
  • इन-स्क्रीन कॅमेरा असेल डिवाइसची खासियत
  • Samsung Galaxy A8s, Huawei Nova 4 आणि Honor View20 आधीच आहेत लिस्ट मध्ये

 

सॅमसंग, हुवावे आणि ऑनर ने यावर्षी इन-स्क्रीन कॅमेरा टेक्नॉलिजीचा वापर करून स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत आणि आता लवकरच मोटोरोला पण या लिस्ट मध्ये सामील होण्यास तयार आहे. पुढल्या वर्षीच्या सुरवातीला अशा आहे कि मोटोरोला मोबाईल वर्ल्ड कांग्रेस मध्ये आपल्या Moto G7 सीरीजची घोषणा करेल. 91mobiles च्या रिपोर्ट नुसार कंपनी आपल्या Moto P सीरीजच्या 2019 वर्जन वर पण काम करत आहे. या सीरीज मध्ये पहिला फोन Moto P40 असू शकतो जो चीनि बाजारात लॉन्च झालेल्या Moto P30 ची जागा घेईल.

Moto P30 चीन पुरताच मर्यादित होता पण आता असे बोलले जात आहे कि Moto P40 एंड्राइड वन ब्रॅण्डिंग सह ग्लोबली लॉन्च केला जाईल. मोटोरोला वन पावर बेसिकली Moto P30 चा रीब्रँडेड वर्जन होता आणि Moto P40 पण ग्लोबल मार्केट मध्ये One Power च्या सक्सेसरच्या जागी लॉन्च होऊ शकतो. एका नवीन रिपोर्ट नुसार या फोन मध्ये पंच होल कॅमेरा दिला जाईल. हि डिजाइन यावर्षी लॉन्च झालेल्या Samsung Galaxy A8s, Huawei Nova 4 आणि Honor View20 मध्ये दिसली होती आणि असे वाटते आहे कि येत्या काळात हे फीचर ट्रेंड होईल.

इतर तिन्ही स्मार्टफोन्स प्रमाणे कॅमेरा होल स्क्रीनच्या टॉप लेफ्ट कॉर्नर मध्ये देण्यात येईल पण या होलचा डायामीटर किती असे याची माहिती मिळाली नाही. Honor म्हणते कि नुकत्याच लॉन्च झालेल्या V20 स्मार्टफोन मध्ये देण्यात आलेल्या डिजाइनचा डायामीटर Samsung च्या तुलनेत छोटा आहे. Motorola P40 6.2 इंचाच्या डिस्प्ले सह येऊ शकतो आणि पंच-होल कॅमेऱ्यामुळे डिवाइस मध्ये कोणतीही नॉच दिसणार नाही आणि एका मोठ्या डिस्प्लेचा अनुभव मिळेल. रेंडर्स मध्ये दिसत आहे कि डिस्प्ले मध्ये खूपच कमी बेजेल्स असतील पण फोनच्या खालच्या भागात एक चिन असेल ज्यावर Motorola ची ब्रॅण्डिंग दिली जाईल.

P40 मध्ये कोणता प्रोसेसर वापरला जाईल याची माहिती अजूनतरी मिळाली नाही पण डिवाइस मध्ये Honor View20 प्रमाणे 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असण्याची शक्यता आहे. डिवाइस मध्ये वर्टिकल डुअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो, पण दुसऱ्या कॅमेऱ्याचे स्पेसिफिकेशन समजलेले नाहीत. डिवाइस मध्ये डुअल कॅमेरा मोड्यूलच्या खाली दोन LED फ्लॅश कंपोनेंट्स दिले जातील आणि डिवाइस मध्ये 3.5mm ऑडियो जॅक आणि USB टाइप-C पोर्ट दिला जाईल. अशा आहे कि डिवाइसला ग्लास बॅक दिली जाईल ज्याच्या मागे एक फिंगरप्रिंट सेंसर असेल आणि सेंसर मधेच मोटोरोलाचा लॉगो पण एम्बेड केला जाईल.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo