Motorola Edge Ultra 30: भारतातील पहिला 200MP कॅमेरा फोन ‘या’ दिवशी लाँच होणार
Motorola Edge Ultra 30 लवकरच होणार लाँच
नव्या फोनमध्ये तब्बल 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर असणार
तसेच, फोनमध्ये 60-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे म्हटले जात आहे
Motorola ने भारतात 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला आपला फ्लॅगशिप फोन Motorola Edge Ultra 30 लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा फोन 13 सप्टेंबरला भारतीय बाजारात सादर केला जाईल. हा फोन चीनी बाजारात लॉन्च झालेल्या Moto X30 Pro चे रीब्रँडेड वर्जन असणार, असल्याचे म्हटले जात आहे. हा फोन गेल्या महिन्यातच लाँच झाला होता. मोटोरोला एज अल्ट्रा 30 स्नॅपड्रॅगन 8+ जनरल 1 प्रोसेसर आणि 60-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरासह ऑफर केला जाईल.
हे सुद्धा वाचा : 50MP सेल्फी कॅमेरासह Vivo चा 5G फोन खरेदी करण्याची उत्तम संधी, फ्लिपकार्ट सेलमध्ये लाँच होणार
Motorola Edge Ultra 30
Motorola Edge Ultra 30 ड्युअल नॅनो सिम सपोर्ट आणि Android 12 सह ऑफर केले जाईल. फोनमध्ये 6.73-इंच लांबीचा फुल HD प्लस पोलेड डिस्प्ले मिळेल, जो 144Hz रिफ्रेश रेट, (1,080×2,400 पिक्सेल) रिझोल्यूशन आणि HDR10+ सपोर्टसह येईल. Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह फोनमध्ये 8 GB LPDDR5 RAM आणि 256 GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज मिळू शकते.
त्याबरोबरच, यात 4,610mAh बॅटरी आणि 125W TurboPower फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट मिळेल. फोनच्या इतर कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर ते 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ v5.2, GPS, NFC आणि USB टाइप-C पोर्टला सपोर्ट करणार आहे.
फोनचा कॅमेरा हे त्याचे सर्वात मोठे आकर्षण असणार आहे. Motorola Edge Ultra 30 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल, जो 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह सुसज्ज असेल. दुसरा 50 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड आणि तिसरा सेन्सर 12 मेगापिक्सेलचा टेलिफोटो शूटर फोनमध्ये उपलब्ध असेल. सेल्फीसाठी फोनमध्ये 60-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. फोनमध्ये प्रोटेक्शनसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही दिला जाईल.
Motorola Edge Ultra 30 ची अपेक्षित किंमत
Motorola Edge Ultra 30 रिटेल स्टोअर्स आणि Flipkart वरून खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीने फोनच्या किंमतीचा खुलासा अद्याप केला नसला तरी, हा फोन Moto X30 Pro चे रीब्रँडेड वर्जन असणार आहे. Motorola Edge Ultra 30 देखील Moto X30 Pro च्या किंमतीच्या आसपास लॉन्च केला जाऊ शकतो. चीनमध्ये, Moto X30 Pro च्या 8 GB RAM सह 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 3,699 युआन म्हणजेच 43,600 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, फोनच्या 12 GB सह 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 4,199 युआन म्हणजे सुमारे 49,500 रुपये आणि 512 GB स्टोरेज वेरिएंटसह 12 GB ची किंमत 4,499 युआन म्हणजे सुमारे 53,000 रुपये होती.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile