Motorola च्या आगामी स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट Confirm! फोनमध्ये मिळेल Stylus Pen सपोर्ट

Motorola Edge 60 stylus स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार
Motorola Edge 60 stylus कंपनी 15 एप्रिल रोजी लाँच करणार आहे.
हा फोन स्टायलस पेन सपोर्टसह येणार आहे, जो आतापर्यंत केवळ प्रीमियम फोन आणि टॅबमध्ये येत होता.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola आगामी Motorola Edge 60 stylus स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच करणार आहे. या फोनची भारतीय लाँच डेट अखेर कंपनीने कन्फर्म केली आहे. या फोनची विक्री प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर उपलब्ध असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनची डिझाईन आणि अनेक प्रमुख फीचर्स Flipkart द्वारे ऑनलाइन उघड करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे हा फोन स्टायलस पेन सपोर्टसह येणार आहे. जाणून घेऊयात Motorola Edge 60 stylus फोनचे लॉन्चिंग आणि तपशील डिटेल्स-
Also Read: 50MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या Oppo फोनवर मिळतोय जबरदस्त Discount, पहा Best ऑफर्स
Motorola Edge 60 stylus चे इंडिया लाँच
Introducing the Motorola edge 60 STYLUS
— Motorola India (@motorolaindia) April 10, 2025
– flex your creativity and flaunt your stylus!Effortlessly creative and precise, just like you!
#motoedge60STYLUS #motorola
Motorola इंडियाने Motorola Edge 60 stylus स्मार्टफोनच्या भारतात लाँच तारखेची पुष्टी केली आहे. हा फोन 15 एप्रिल रोजी भारतात लाँच होईल. आम्ही सांगितल्याप्रमाणे, हा फोन स्टायलस पेन सपोर्टसह येणार आहे, जो आतापर्यंत केवळ प्रीमियम फोन आणि टॅबमध्ये येत होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, कंपनी या फोनला फ्लेक्स युअर क्रिएटिव्हिटी या टॅगने टीज करत आहे.
Motorola Edge 60 stylus चे फीचर्स आणि स्पेक्स (अपेक्षित)
Motorola Edge 60 stylus फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा 1.5K pOLED डिस्प्ले असेल. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7S Gen 2 प्रोसेसर असेल. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 256GB स्टोरेज उपलब्ध असेल. या फोनमध्ये बिल्ट-इन स्टायलस सपोर्ट उपलब्ध असेल. एवढेच नाही तर, पाण्याच्या प्रतिकारासाठी या फोनला IP68 रेटिंग दिले जाणार आहे.
तसेच, फोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स देखील पुढे आले आहेत. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP Sony Lytia 700C कॅमेरा दिला जाणार आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 68W TourboPower फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळणार आहे. त्यासोबत, या फोनमध्ये 15W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देखील मिळेल. मात्र, या फोनची खरी किंमत आणि सर्व स्पेक्स फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile