प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola आपला आगामी Motorola Edge 60 Pro फोन भारतात लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन मागील Edge 50 Pro ची अपग्रेडेड आवृत्ती असेल. आगामी फोनबद्दल अधिकतर माहिती लीक झाली आहे. या फोनमध्ये चार कॅमेरे आणि 512GB स्टोरेज सारखे पॉवरफुल फीचर्स असतील. आता या फोनची किंमत देखील लीक झाली आहे.
लीक रिपोर्ट्सनुसार, Motorola एक नवीन एक्स्ट्रा बटन सादर करणार आहे. हे एक्सट्रा बटन आपल्याला iPhone 16 आणि Nothing Phone 3a सिरीजसारखे असेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Motorola Edge 60 Pro ची लीक किंमत आणि तपशील-
लीक रिपोर्ट्सनुसार, Motorola Edge 60 Pro ची किंमत EUR 649.89 म्हणजेच अंदाजे 60,000 रुपये असण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर, लीकनुसार हा स्मार्टफोन ब्लु, ग्रीन आणि पर्पल कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल. सध्या, या मोटोरोला फोनबद्दल अधिकतर माहिती ऑनलाईन पुढे येत आहे. मात्र, कंपनीने अद्याप या फोनबद्दल अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.
लीक्सनुसार Motorola Edge 60 Pro मध्ये डाव्या बाजूला एक एक्सट्रा बटन असेल, असे बोलले जात आहे. हे बटन iPhone 16 च्या कॅमेरा कंट्रोल फीचरप्रमाणे कार्य करेल. तसेच, या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 10MP सेकंडरी कॅमेरा, 13MP थर्ड कॅमेरा आणि 20MP सेल्फी कॅमेरा असेल अशी शक्यता आहे.
Motorola चा आणखी एक स्मार्टफोन लवकरच लाँच होणार आहे. नुकतेच, प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart मायक्रोसाईटद्वारे फोनची लाँच तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा फोन पुढील महिन्यात 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा!