Motorola Edge 60 Fusion फोन अखेर भारतात लाँच! जाणून घ्या किंमत आणि टॉप 5 फीचर्स 

Motorola Edge 60 Fusion फोन अखेर भारतात लाँच! जाणून घ्या किंमत आणि टॉप 5 फीचर्स 
HIGHLIGHTS

Motorola Edge 60 Fusion स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच

हा फोन मिड बजेटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

मोटोरोलाने अनेक पॉवरफुल AI फीचर्ससह स्मार्टफोन सादर केला आहे.

Motorola Edge 60 Fusion स्मार्टफोन भारतीय बाजारात अनेक दमदार फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे. या फोनची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. अखेर हा फोन भारतात लाँच झाला आहे. हा फोन मिड बजेटमध्ये लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे फोनला पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी IP68 + IP69 रेटिंग देण्यात आले आहे. मोटोरोलाने अनेक पॉवरफुल AI फीचर्ससह स्मार्टफोन सादर केला आहे. जाणून घेऊयात Motorola Edge 60 Fusion ची किंमत, ऑफर्स आणि संपूर्ण स्पेक्स-

Also Read: Lava चा बोल्ड स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच, 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये मिळतील जबरदस्त फीचर्स

Motorola Edge 60 Fusion launched in india check specs and price

Motorola Edge 60 Fusion ची किंमत

Motorola Edge 60 Fusion स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 22,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. ही या फोनच्या 8GB रॅमसह 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. तर, दुसरीकडे 12GB+ 256GB च्या टॉप व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये इतकी आहे.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, फोनची विक्री 9 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. पहिल्या सेलमध्ये, फोनवर ऑफर्स मिळणार आहेत. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, IDFC आणि Axis Bank कार्डवर 2000 रुपयांची त्वरित सूट मिळणार आहे.

Motorola Edge 60 Fusion चे फीचर्स आणि स्पेक्स

डिस्प्ले

Motorola Edge 60 Fusion स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यासह, या फोनमध्ये गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन उपलब्ध आहे.

प्रोसेसर आणि स्टोरेज

स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 12GB रॅमसह 256GB पर्यंत स्टोरेज आहे. स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, या मोटोरोला स्मार्टफोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आहे. तसेच, फोटोग्राफीसाठी मागील बाजूस 13MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि मॅक्रो लेन्स उपलब्ध आहेत. मागच्या बाजूला फ्लॅश देखील देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 32MP कॅमेरा देण्यात आला आहे.

Motorola Edge 60 Fusion

बॅटरी

Motorola Edge 60 Fusion फोनमध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आले आहे. या बॅटरीसह हा फोन 68W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो, ज्याद्वारे फोन 9 मिनिटांत चार्ज होतील.

इतर फीचर्स

पाणी आणि धूळ साठी Motorola Edge 60 Fusion फोनला IP68 आणि IP69 रेटिंग देण्यात आले आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये AI Magic सारखे फीचर्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo