Motorola Edge 60 Fusion ‘या’ दिवशी भारतात होणार दाखल! आगामी फोन आकर्षक फीचर्सने सज्ज

Motorola Edge 60 Fusion स्मार्टफोनची भारतात लाँच तारीख निश्चित
Motorola Edge 60 Fusion येत्या फोन 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे.
Flipkart लिस्टिंगद्वारे फोन लाँच होण्यापूर्वी Motorola Edge 60 Fusion चे अनेक फीचर्स कन्फर्म
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola चा आगामी फोन लाँच होण्यासाठी सज्ज झाला आहे. Motorola Edge 60 Fusion स्मार्टफोनची भारतात लाँच तारीख निश्चित झाली आहे. हा कंपनीचा नवीनतम फोन असेल. फोनची विक्री फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. फोनची लाँच तारीख, डिझाइन आणि काही प्रमुख फीचर्स आज Flipkart द्वारे निश्चित करण्यात आली आहेत. हा फोन 6.7 इंच लांबीच्या डिस्प्लेसह येईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP चा प्राथमिक कॅमेरा असेल.
Also Read: Upcoming Smartphones This Week: ‘या’ आठवड्यात लाँच होणार जबरदस्त फोन्स, किंमत 15000 रुपयांपेक्षा कमी
Motorola Edge 60 Fusion भारतीय लाँच डेट
Motorola Edge 60 Fusion कंपनीने फोनच्या भारतात लाँच तारखेची पुष्टी केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart मायक्रोसाईटद्वारे फोनची लाँच तारीख उघड करण्यात आली आहे. हा येत्या फोन 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे.
Motorola Edge 60 Fusion फ्लिपकार्ट लिस्टिंग
वर सांगितल्याप्रमाणे, Flipkart लिस्टिंगद्वारे फोन लाँच होण्यापूर्वी Motorola Edge 60 Fusion च्या अनेक फीचर्सची पुष्टी करण्यात आली आहे. त्यानुसार, या फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेमध्ये 1.5K कर्व डिस्प्ले उपलब्ध आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 प्रोसेसर असेल. कंपनी फोनसोबत 3 वर्षांचे OS अपडेट्स आणि 4 वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देणार आहे.
स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB आणि 12GB रॅमचे पर्याय असतील, तर या फोनची स्टोरेज 256GB असेल. त्याबरोबरच, मायक्रो SD कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. पाण्यापासून संरक्षणासाठी फोनला IP68 आणि IP69 रेटिंग असेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, ही बॅटरी 5500mAh ची आहे, ज्यामध्ये 68W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. मात्र, फोनची किंमत आणि संपूर्ण फीचर्स आणि स्पेक्स फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile