AI फीचर्सने सुसज्ज Motorola Edge 50 Ultra ची भारतात पहिली सेल सुरु, मिळेल तब्बल 10,000 रुपयांपर्यंत Discount

Updated on 24-Jun-2024
HIGHLIGHTS

लेटेस्ट Motorola Edge 50 Ultra स्मार्टफोन गेल्या आठवड्यात भारतात लाँच

पहिल्या सेलदरम्यान Motorola Edge 50 Ultra मोठ्या सवलतीसह खरेदी करण्याची संधी

Motorola चा हा स्मार्टफोन Moto AI फंक्शनने सुसज्ज आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने आपल्या लेटेस्ट Motorola Edge 50 Ultra स्मार्टफोन गेल्या आठवड्यात भारतात लाँच केला. दरम्यान, नव्या स्मार्टफोनची पहिली सेल आज म्हणजेच 24 जून 2024 रोजी सुरू झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, पहिल्या सेलदरम्यान मोठ्या सवलतीसह हँडसेट खरेदी करण्याची संधी असेल. हा Motorola स्मार्टफोन लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. जाणून घेऊयात Motorola Edge 50 Ultra स्मार्टफोनची विक्री तपशील आणि ऑफर्स-

Also Read: Redmi 13 5G फोनची भारतीय लाँच डेट कन्फर्म, 108MP कॅमेरासह अजून काय मिळेल विशेष?

Motorola Edge 50 Ultra चे पहिल्या सेलमधील ऑफर्स

Motorola Edge 50 Ultra स्मार्टफोनची पहिली विक्री आज दुपारी 12 वाजतापासून सुरु झाली आहे. Motorola Edge 50 Ultra स्मार्टफोनमध्ये 12GB रॅमसह 512GB अंतर्गत स्टोरेजसह भारतात सादर केला आहे. हा फ्लॅगशिप फोन 54,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. लक्षात घ्या की, पहिल्या सेलदरम्यान हा स्मार्टफोन 10,000 रुपयांचा एक्सट्रा ऑफ मिळत आहे.

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर HDFC कार्डद्वारे नॉन EMI व्यवहार केल्यास 5000 रुपयांची बँक सवलत देखील उपलब्ध आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Flipkart आणि Motorola.in वरून खरेदी करता येईल. येथून खरेदी करा

Motorola Edge 50 Ultra चे फीचर्स आणि स्पेक्स

या फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा टच सॅम्पलिंग रेट 360Hz आणि रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे. हा फोन स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज करण्यात आला आहे. मोटोरोलाचा हा फोन Moto AI फंक्शनने सुसज्ज आहे. फोनमध्ये उपलब्ध फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ड्युअल सिम स्लॉट आणि USB टाइप-C पोर्ट इ. फीचर्स मिळतील.

motorola edge 50 ultra features

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP मुख्य कॅमेरा, 50MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 64MP टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 50MP कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे, यात 125W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की. फोनमध्ये 50W वायरलेस चार्जिंग आणि 100W वायरलेस पॉवर शेअरिंग सुविधा देखील आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :