स्मार्टफोन निर्माता कंपनी Motorola Edge 50 सिरीजचे फ्लॅगशिप डिव्हाइस Motorola Edge 50 Ultra अखेर भारतीय बाजरात लाँच करण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सुसज्ज Moto AI देण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, AI चा सपोर्ट कॅमेरामध्ये देखील उपलब्ध असेल, ज्यामुळे यूजर्स चांगले फोटो क्लिक करू शकतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Motorola Edge 50 Ultra ची किंमत आणि तपशील-
स्मार्टफोन ब्रँड Motorola ने या 5G फ्लॅगशिप फोनची किंमत 59,999 रुपये ठेवली आहे. मात्र, यासह मर्यादित कालावधीची सूट आणि बँक सवलत मिळणार आहे. या सवलतींसह हा फोन 10,000 रुपये कमी किमतीत म्हणजेच 49,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. ही किंमत फोनच्या 12GB + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची असेल. उपब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 24 जूनपासून Flipkart वर सुरू होईल.
Motorola Edge 50 Ultra स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा P-OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटसह येतो. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक फीचर देखील मिळेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर दिला आहे. त्याबरोबरच, हा स्मार्टफोन Android 14 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करेल.
कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, Motorola Edge 50 Ultra मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 50MP मुख्य सेन्सर, 64MP टेलिफोटो लेन्स आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. जो Moto AI फंक्शनने सुसज्ज आहे. या नव्या सपोर्टसह सर्वोत्तम पिक्चर्स क्लिक केले जाऊ शकतात. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या हँडसेटच्या पुढील बाजूस 50MP कॅमेरा उपलब्ध आहे.
याव्यतिरिक्त, पॉवरसाठी या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी आहे. यात 125W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. यात 50W वायरलेस चार्जिंग आणि 10W वायरलेस पॉवर शेअरिंगची सुविधा आहे. फोनमधील उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी या हँडसेटला Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ड्युअल सिम स्लॉट आणि USB टाइप-C पोर्ट सारखे स्पेक्स दिले गेले आहेत.