Motorola चा आगामी स्मार्टफोन Motorola Edge 50 Ultra भारतात लाँच होण्यासाठी सज्ज झाला आहे. स्मार्टफोनच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी करण्यात आली आहे. होय, कंपनी एज सीरीज अंतर्गत एक नवीन फोन भारतात लाँच करणार आहे. हा फोन अनेक AI फीचर्सने सुसज्ज असेल. आगामी Motorola Edge 50 Ultra फोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट Flipkart वर लाइव्ह झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात Motorola Edge 50 Ultra चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-
Also Read: बिल्ट-इन UPI पेमेंट फीचरसह नवा Nokia 3210 4G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
Motorola India ने त्यांच्या अधिकृत X म्हणजेच Twitter हँडलवर Motorola Edge 50 Ultra स्मार्टफोनच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी केली आहे. हा फोन भारतात 18 जून 2024 रोजी लाँच केला जाईल. या पोस्टमध्ये कंपनीने माहिती दिली आहे की, हा फोन भारतात Flipkart आणि Motorola India च्या वेबसाइटवरून खरेदी केला जाऊ शकतो. फोनमध्ये फॉरेस्ट ग्रे, नॉर्डिक वुड्स आणि पीच फझ हे तीन कलर पर्याय उपलब्ध असतील.
Flipkart लिस्टिंगद्वारे फोनचे अनेक फीचर्स समोर आले आहेत. Motorola Edge 50 Ultra फोन 6.7 इंच लांबीच्या 3D कर्व pOLED डिस्प्लेसह येऊ शकतो. या डिस्प्लेचा रिफ्रेश दर 144Hz असेल. याशिवाय, उत्तम परफॉर्मन्ससाठी हा फोन Qualcomm Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज असेल. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये OIS सपोर्टसह 50MP प्राथमिक कॅमेरा प्रदान केला जाईल. या फोनमध्ये 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला जाईल.
त्याबरोबरच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा दिला जाईल. या फोनमध्ये 125W TurboPower वायर्ड चार्जिंग सपोर्ट असेल. यासह, 50W वायरलेस चार्जिंग आणि 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल.
याव्यतिरिक्त, हा फोन अनेक AI फीचर्सने सुसज्ज असेल. कंपनी या फोनमध्ये Moto AI देणार आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला अनेक AI फीचर्सचा आनंद घेता येणार आहे. यात मॅजिक कॅनव्हासचा समावेश आहे, जो वापरकर्त्याच्या इनपुटवर AI इमेजेस तयार करण्यास सक्षम असेल. याशिवाय, या फोनमध्ये ॲक्शन शॉट दिला जाईल, जो मोशन दरम्यान काढलेले अस्पष्ट फोटो दुरुस्त करेल. यामध्ये स्मार्ट कनेक्ट फीचर देखील प्रदान केले जाईल, जे तुम्हाला वेगवेगळ्या डिव्हाइसेसवर प्रवाहित करण्यास अनुमती देईल.