Motorola ने आपल्या आगामी स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. होय, आगामी Motorola Edge 50 Pro स्मार्टफोनसाठी समर्पित मायक्रोसाइट Flipkart वर सूचीबद्ध करण्यात आली आहे. या लिस्टिंगच्या माध्यमातून लाँचपूर्वी फोनचे अनेक मुख्य फीचर्स समोर आले आहेत. मात्र, हा फोन Flipkart लिस्टिंगमध्ये Coming soon टॅगसह सूचीबद्ध आहे. सध्या कंपनीने फोनच्या लाँच डेटचा खुलासा केलेला नाही. मात्र या लिस्टिंगद्वारे फोनबद्दल बरीच माहिती उघड झाली आहे. बघुयात सविस्तर-
हे सुद्धा वाचा: भारीच की! आगामी Lava O2 लवकरच भारतात होणार दाखल, जाणून घ्या फोनमध्ये काय मिळेल विशेष?
आम्ही तुम्हाला सांगतो की, Motorola कंपनीने अलीकडेच एका प्रेस रिलीजद्वारे लॉन्च इव्हेंटच्या तारखेची पुष्टी केली होती. प्रेस रिलीजनुसार, कंपनी 3 एप्रिल 2024 रोजी भारतात लाँच इव्हेंट आयोजित करणार आहे. मात्र, या लाँच इव्हेंटमध्ये कोणते डिव्हाइस लाँच केला जाईल, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर, लिस्टिंगनुसार हा फोन Motorola Edge 50 Pro असेल.
Motorola Edge 50 Pro च्या कन्फर्म फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 6.7 इंच लांबीच्या pOLED 3D कर्व डिस्प्लेसह येईल. सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात 50MP प्राथमिक कॅमेरा असेल. यात 13MP मॅक्रो आणि अल्ट्रा-वाइड सेन्सरचा समावेश असेल.
एवढेच नाही तर, फोनमध्ये अनेक AI कॅमेरा फीचर्स देखील दिले जातील. फोनच्या कलर ऑप्शन्सची माहिती देखील Flipkart लिस्टद्वारे समोर आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन ग्रे, ब्लॅक आणि पर्पल कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात येईल. फोनच्या इतर सर्व फीचर्सची माहिती फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येईल.