Motorola Edge 50 Pro फोनची भारतात पहिली विक्री सुरु, मिळतील अप्रतिम डील्स आणि Best ऑफर्स। Tech News 

Motorola Edge 50 Pro फोनची भारतात पहिली विक्री सुरु, मिळतील अप्रतिम डील्स आणि Best ऑफर्स। Tech News 
HIGHLIGHTS

नवीनतम Motorola Edge 50 Pro स्मार्टफोनची पहिली विक्री भारतात सुरु

ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर हा स्मार्टफोन सवलतीसह उपलब्ध

Motorola Edge 50 Pro वर HDFC बँकेकडून 2000 रुपयांची सूट

Motorola चा लेटेस्ट स्मार्टफोन Motorola Edge 50 Pro या महिन्याच्या सुरुवातीला लाँच झाला. त्यानंतर, या स्मार्टफोनची पहिली विक्री आज म्हणजेच 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. पहिल्या सेलदरम्यान या फोनवर बंपर डिस्काउंट, कॅशबॅक आणि परवडणारी EMI उपलब्ध असेल. विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, Edge 50 Pro क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 प्रोसेसरसह येतो. त्याबरोबरच, हँडसेटमध्ये 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. चला तर मग बघुयात Motorola Edge 50 Pro फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स-

motorola edge 50 pro

Motorola Edge 50 Pro ची किंमत

Motorola ने Edge 50 Pro च्या 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये ठेवली आहे. तर, या फोनचे 12GB+256GB स्टोरेज मॉडेल 35,999 रुपयांच्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Motorola Edge 50 Pro वरील ऑफर्स

Motorola Edge 50 Pro स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर दुपारी 12 वाजता सुरू होईल. यावर HDFC बँकेकडून 2000 रुपयांची सूट मिळेल. याव्यतिरिक्त, Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे 5% कॅशबॅक देखील उपलब्ध असेल. एवढेच नाही तर, हा नवीनतम फोन 1,567 रुपये प्रति महिना EMI वर देखील खरेदी केला जाऊ शकतो. Buy From Here

Motorola Edge 50 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Motorola-Edge-50-Pro-Camera
Motorola Edge 50 Pro Camera

Motorola Edge 50 Pro स्मार्टफोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंच लांबीचा POLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1.5K आहे. यात स्टाइल सिंक AI जनरेटिव्ह थीमिंग मोड आणि AI ॲडॉप्टिव्ह स्टॅबिलायझेशनसाठी सपोर्ट आहे. सुरक्षिततेसाठी, फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देखील उपलब्ध आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 चिप मिळेल.

फोटोग्राफीसाठी, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये पहिला 50MP मुख्य लेन्स, दुसरा 10MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि तिसरा 13MP लेन्स आहे. आकर्षक सेल्फीसाठी हँडसेटमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी, या फोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे. जी 50W वायरलेस, 125W वायर्ड आणि 68W टर्बो चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. या स्मार्टफोनची बॅटरी सिंगल चार्जवर 30 तास टिकू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo