Motorola ची मागील बरेच काळापासून Motorola Edge 50 Pro च्या भारतीय लाँचसाठी तयारी सुरु होती. हा स्मार्टफोन आज 3 एप्रिल 2024 रोजी भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा प्रीमियम फोन AI पावर्ड फीचर्ससह सादर केला आहे. स्मार्टफोनची विक्री लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर सुरु होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात Motorola Edge 50 Pro ची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-
हे सुद्धा वाचा: Limited Time Offer! Lava Agni 2 5G वर मिळतोय प्रचंड Discount, अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही। Tech News
Motorola Edge 50 Pro स्मार्टफोन दोन प्रकारात भारतात सादर केला गेला आहे. फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येणाऱ्या व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे. तर, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह टॉप व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये इतकी निश्चित झाली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Flipkart आणि Motorola च्या वेबसाइटवर 9 एप्रिलपासून स्मार्टफोनची विक्री सुरू होईल.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँकेच्या कार्डांवर 2250 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, 2000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील दिला जाईल. इतकेच नाही तर, अर्ली बर्ड ऑफर अंतर्गत 2000 रुपयांची अतिरिक्त ऑफर देखील दिली जात आहे.
Motorola च्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा pOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. विशेष म्हणजे हा फोन स्टाइल सिंक AI जनरेटिव्ह थीमिंग मोड आणि व्हिडिओसाठी AI अडॅप्टिव्ह स्टॅबिलायझेशनसह आणला गेला आहे. फोनमध्ये डोळ्यांच्या सुरक्षेसाठी SGS देण्यात आला आहे. स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. यामध्ये स्टिरिओ स्पीकरसारखे फीचर्स देखील उपलब्ध आहेत. परफॉर्मन्ससाठी फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरसह आणला गेला आहे.
फोटोग्राफीसाठी, एक 50MP मुख्य कॅमेरा आणि 10MP 3x टेलीफोटो लेन्स मागील बाजूस उपलब्ध आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 50MP सेल्फी कॅमेरा आहे. पॉवरसाठी हा फोन 125W वायर्ड आणि 68W टर्बो चार्जिंग सपोर्टसह येतो. यात 4500mAh बॅटरी आहे. तसेच, हे 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येते. ही बॅटरी एका चार्जवर 30 तास चार्ज राहील, असा कंपनीचा दावा आहे.