वेगन लेदर फिनिशसह Motorola Edge 50 Neo लेटेस्ट फोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
नवीन स्मार्टफोन Motorola Edge 50 Neo भारतात लाँच केला आहे.
Motorola ने Edge 50 सीरिजमध्ये Edge 50, Edge 50, Edge 50 फ्यूजन आणि Edge 50 अल्ट्रा आधीच लाँच केले आहेत.
विशेषतः Motorola Edge 50 Neo फोनमध्ये 30X AI झूम आणि Moto AI चा सपोर्ट असेल.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने आज आपल्या Edge 50 सीरिजचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन Motorola Edge 50 Neo भारतात लाँच केला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या लाइनअपमधील हा पाचवा फोन आहे. याआधी Edge 50, Edge 50, Edge 50 फ्यूजन आणि Edge 50 अल्ट्रा हे मॉडेल्स बाजारात लाँच झाले आहेत. विशेषतः या फोनमध्ये 30X AI झूम आणि Moto AI चा सपोर्ट असेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता Motorola Edge 50 Neo फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊयात.
Also Read: 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत देशी कंपनी LAVA चा स्वस्त स्मार्टफोन लाँच, मिळतील Powerful स्पेक्स
Motorola Edge 50 Neo ची भारतीय किंमत
Sleek, durable, and MIL-810H certified, the #MotorolaEdge50Neo shines with Sony – LYTIA™ 700C, Adaptive Stabilization, and Pantone colors. 📱✨
— Motorola India (@motorolaindia) September 16, 2024
Launched with 8+256GB at ₹22,999/-, sale starts 24 Sep @Flipkart, https://t.co/YA8qpSXba4 & leading stores.#ReadyForAnything
लेटेस्ट Motorola Edge 50 Neo ची किंमत 22,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत फोनच्या 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 24 सप्टेंबरपासून ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर लाईव्ह होईल. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत हा फोन ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट देण्यात आला आहे.
Motorola Edge 50 Neo चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Motorola Edge 50 Neo नवा स्मार्टफोन वेगन लेदर फिनिशसह येतो. हा फोन अगदी मजबूत बॉडीसह लाँच करण्यात आला आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या मोबाईल फोनमध्ये 6.4 इंच लांबीचा सुपर HD LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर उपलब्ध आहे. विशेषतः या फोनमध्ये AI स्टाईल सिंक आणि AI मॅजिक कॅनव्हास सारखी AI फीचर्स देखील आहेत. पुढील पाच वर्षांसाठी हँडसेटला सॉफ्टवेअर अपडेट्स दिले जातील.
फोटोग्राफीसाठी, या नव्या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. या सेटअपमध्ये पहिला OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. त्याबरोबरच, दुसरा 10MP टेलिफोटो आहे आणि तिसरा 13MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनच्या फ्रंटमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, या स्मार्टफोनमध्ये 4310mAh बॅटरी आहे, जी 68W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगसह सुसज्ज आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile